ITR Filing Date Extended | करदात्यांना दिलासा ! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या शेवटची तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ITR Filing Date Extended | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारकडून या मुदतीत वाढ करण्यात आली असल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले. आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. आयकर रिटर्न आणि आयकर अधिनियम, 1961 अंतर्गत मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी ऑडिट रिपोर्ट दाखल करताना येणाऱ्या अडचणी करदात्यांनी नोंदवल्या तसेच सीबीडीटीने आयटीआर दाखल करण्याची तारीख आणि ऑडिट रिपोर्टच्या तारखा मूल्यांकन वर्ष 21-22 साठी वाढविण्यात (ITR Filing Date Extended) आल्याचे ट्विट करून इन्कम टॅक्स इंडियाने सांगितले आहे.

इनकम टॅक्स रिटर्न कसे भरावे?

इन्कम टॅक्स रिटर्न खाली सांगितलेल्या पद्धतीने आपण भरू शकतो.

आयकरच्या https://www.incometax.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे. तुमचा पॅन तपशील, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट केल्यानंतर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

त्यानंतर ई-फाइल मेनूवर क्लिक करा आणि इन्कम टॅक्स रिटर्न लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर आयकर रिटर्न पृष्ठावर पॅन ऑटो पॉप्युलेट होईल, येथे मूल्यांकन वर्ष निवडा, आता आयटीआर फॉर्म क्रमांक निवडा, आता तुम्हाला फायलिंग प्रकार निवडावा ज्यामध्ये मूळ / सुधारित रिटर्न निवडावे.

हि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिशन मोड निवडा ज्यामध्ये ऑनलाईन तयारी आणि सबमिट निवडावे लागेल.

नंतर Continue वर क्लिक करा. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे आपणाला दिसतील. ती वाचून झाल्यानंतर ऑनलाईन आयटीआर फॉर्ममध्ये रिक्त असलेल्या सर्व फिल्डमध्ये आपले तपशील भरा.

सर्व माहिती भरल्यानंतर पुन्हा कर आणि पडताळणी टॅबवर जा आणि तुमच्यानुसार सत्यापन पर्याय निवडा. त्यानंतर आपणाला पुन्हा सर्व माहिती बरोबर आहे कि नाही याची खात्री करायला सांगण्यात येईल. ते झाल्यांनतर सबमिट बटणावर क्लिक करा. भरलेली माहिती योग्य आहे याची पुष्टी करा ते झाल्यानंतर शेवटी ITR सबमिट करा.

Web Titel :- ITR Filing Date Extended | extended deadline for filing income tax returns know the deadline

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात नर्सच्या वेशातील महिलेनं पळविले 3 महिन्याच्या मुलीला ! ससून हॉस्पीटलमधील घटनेने खळबळ

Pune Police Transfer | पुण्यातील ACP मच्छिंद्र चव्हाण, सुधाकर यादव, SDPO सई भोरे यांच्यासह 17 अधिकार्‍यांच्या बदल्या; ACP नारायण शिरगांवकर, विजयकुमार पळसुले, आरती बनसोडे यांची पुणे शहरात बदली

Pune Crime | पत्नीला वेडी ठरवून नेले भोंदुबाबाकडे, त्याने उपचाराच्या बहाण्याने केले अश्लिल चाळे