ITR भरण्याची शेवटची तारीख 31 ‘ऑगस्ट’च, नंतर रिटर्न फाईल करणाऱ्यांना 5000 रुपयांचा दंड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने ITR म्हणजे आयकर भरण्याच्या अंतिम तारखेत कोणतेही बदल केलेले नाहीत. ITR भरण्याची अंतिम तारीख शनिवार 31 ऑगस्टच असणार आहे. सध्या सोशल मिडियावर एक फेक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे, की सरकारने ITR भरण्याची अंतिम तारीख वाढवून 30 सप्टेंबर केली आहे. हे पूर्णता: खोटे आहे. आयकर विभागाने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या सूचनेत म्हणले आहे, की ITR भरण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत.

याआधीच केली होती मुदतीत वाढ –

आयकर भरणाऱ्यासाठी या आधीच मुदत वाढवून दिली होती, यापुर्वी अंतिम तारीख 31 जुलै होती, यानंतर आयकर भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ITR ऑनलाइन भरता येतो.

31 ऑगस्टनंतर लागणार 5,000 रुपये दंड –

31 ऑगस्टनंतर ITR भरल्यास तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. हा दंड 31 डिसेंबर पर्यंत ITR भरणाऱ्यासाठी असेल. 31 डिसेंबर नंतर ITR दाखल करणाऱ्यासाठी दंड जवळपास दुप्पट आकारण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त –