ITR Filing | जर तुमच्याकडे नसेल फॉर्म 16 तरीसुद्धा फाईल करू शकता आयटीआर, जाणून घ्या कशी आहे ही पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ITR Filing | आयटीआर भरण्यासाठी (ITR File) अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते, फॉर्म 16 (Form-16) हा असाच एक दस्तऐवज आहे, ज्याशिवाय आयटीआर (Income Tax Return) अवैध होण्याचा धोका सर्वाधिक असतो. पगारदार व्यक्तीला प्राप्तीकर रिटर्न भरण्यासाठी फॉर्म 16 आवश्यक आहे. हा स्त्रोतावर कर कपातीचा तपशील असतो आणि एका आर्थिक वर्षात पगारदार करदात्याने भरलेल्या एकूण कराचा तपशील देतो. प्रत्येक नियोक्त्याने आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्या कर्मचार्‍यांना फॉर्म 16 जारी करणे आवश्यक आहे. (ITR Filing)

 

नियोक्त्याने व्यवसाय बंद केल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे अनेक वेळा कर्मचार्‍यांना फॉर्म 16 मिळू शकत नाही. तुम्ही अलीकडे नोकर्‍या बदलल्या असल्या तरीही, हा फॉर्म मिळण्यास विलंब होऊ शकतो. परंतु काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही फॉर्म 16 न मिळवताही तुमचे प्राप्तीकर रिटर्न भरू शकता. तुमची सॅलरी स्लिप या कामात मदत करेल. सर्व कपातीचे तपशील पगाराच्या स्लिपमध्ये दिलेले असतात, म्हणून ती फॉर्म 16 च्या जागी वापरता येऊ शकते.

 

फॉर्म 16 शिवाय असा दाखल करा आयटीआर

ज्या आर्थिक वर्षासाठी तुम्ही रिटर्न भरत आहात त्या आर्थिक वर्षासाठी तुम्हाला दरमहा मिळणारा पगार मोजा. जर तुम्ही एका आर्थिक वर्षात नोकरी बदलली असेल तर नवीन नियोक्त्याकडून मिळालेला पगार देखील समाविष्ट करा. सॅलरी स्लिपमध्ये टीडीएस, पीएफ कपात, मूळ वेतन आणि इतर भत्त्यांची माहिती असते. (ITR Filing)

 

फॉर्म 26AS वापरून टीडीएसची करा गणना

तुमच्या एकुण कमाईची गणना केल्यानंतर, मासिक पगार स्लिपमधून तुमच्या नियोक्त्याने किती कर कापला आहे याची गणना करा. नंतर ही एकूण रक्कम फॉर्म 26AS सोबत पडताळणी करा, ज्यात ई-फायलिंग वेबसाइटवर लॉग इन करून अ‍ॅक्सेस करता येऊ शकतो. फॉर्म 26AS मध्ये टीडीएस, स्रोतावरील कर, भरलेला आगाऊ कर आणि सेल्फ असेसमेंट टॅक्सचा तपशील असतो.

 

एचआरए कपात देखील समाविष्ट करा

तुम्हाला घरभाडे भत्ता (एचआरए) मिळत असल्यास, तोही जोडा. तुम्ही भाडे भरल्यास, तुम्ही कपातीचा दावा करू शकता, परंतु तुम्ही आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीसाठी किमान एक भाडे पावती सबमिट करणे आवश्यक आहे. याशिवाय, जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्ही भरलेल्या व्याजावर कपातीचा दावा करू शकता.

 

इतर स्त्रोतांकडून उत्पन्न

बँक ठेवी, म्युच्युअल फंड इत्यादींवर मिळालेले व्याज आयटीआर फाइलिंगमध्ये नोंदवले पाहिजे.

 

एकूण कपातीची गणना करा

एकदा तुम्ही एकूण उत्पन्नाची गणना केल्यानंतर, प्राप्तीकर कायद्याच्या 80 सी आणि 80 डी अंतर्गत वजावटीची गणना करा.
लक्षात ठेवा की, सर्व कपातीच्या मर्यादा आहेत.
एखादी व्यक्ती कलम 80 सी अंतर्गत EPF, PPF आणि LIC ठेवींसाठी 1,50,000 रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकते.
आरोग्य विम्यासाठी भरलेल्या प्रीमियमवरील कपात दावा कलम 80 डी अंतर्गत केला जाऊ शकतो.
ईपीएफ कपातीसाठी फक्त तुमचे योगदान मोजा, नियोक्त्याचे नाही. फॉर्म 26 एएसशी जुळवून सर्व तपशील तपासा.

 

Web Title :- ITR Filing | how to file itr without form16

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा