खुशखबर ! आता ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ भरणे सोपं झालं, ‘e-Filing Lite’ सुविधा लॉन्च, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करदात्यांना सुविधा देण्यासाठी आयकर विभागाने आयकर रिटर्न फायलिंगसाठी ई-फायलिंग लाइट सुविधा लॉन्च केली आहेत. हे ई-फायलिंगचे एक हलके आणि नवीन वर्जन असणार आहे. ई फायलिंगल लाइट हे आयकर रिटर्न करताना वेगाने आणि सहज हाताळता येईल. त्यामुळे आता तुम्हाला आयकर भरताना लागणारा वेळ किंवा येणाऱ्या समस्यांची अडचण येणार नाही. ज्याप्रकारे फेसबुक लाइट हे अ‍ॅप आहे, त्या प्रकारे आयकर विभागाने हे ई-फायलिंग लाइट हे अ‍ॅप लॉन्च केले आहे.

ई-फायलिंग लाइट लॉन्च
आयकर विभागाने सांगितले आहे की, ते ई फायलिंग लाइट लॉन्च केले आहे. याशिवाय आयकर विभागाने आयकर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याशिवाय ई – फायलिंग पोर्टलचे देखील हलके वर्जन आयकर विभागाने आणले आहे. आयकर विभागाने सांगितले की, या सुविधेचा लाभ https://www.incometaxindiaefiling.gov.in च्या वेब पेजवर जाऊन तसेच e-Filing Lite बटनावर क्लिक करुन घेऊ शकतात.

आयकर विभागाने सांगितले की लाइट वर्जनसाठी नवीन टॅब वेबपार्टलवर उपलब्ध करुन देण्यात येईल आणि जेव्हा रजिस्टर्ड टॅक्सपेअर पेजवर लॉग – इन करतील, तेव्हा त्यांना लिंक उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्याने ITR आणि २६ AS फॉर्मची ई-फायलिंग करु शकतील. हे हालके वर्जन करदात्यांच्या आयकर भरण्याच्या प्रक्रियेला वेगवान आणि सोपे बनवतील.

आयकर भरण्याची तारीख सरकारने ३१ जुलै ऐवजी आता वाढवून ३१ ऑगस्ट केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –