Homeताज्या बातम्याITR Filing Last Date | करदात्यांना दिलासा ! आयटीआर दाखल करण्याची शेवटची...

ITR Filing Last Date | करदात्यांना दिलासा ! आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली; जाणून घ्या नवीन तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ITR Filing Last Date | सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे सीबीडीटी (CBDT) ने इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयटीआर (ITR) दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवून 30 सप्टेंबर केली आहे. अगोदर ही तारीख 31 ऑगस्ट होती. हा बदल विवाद से विश्वास (VSV) अ‍ॅक्ट सेक्शन 3 च्या अंतर्गत करण्यात आला आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) च्या नवीन पोर्टल (New IT Portal) मध्ये तांत्रिक समस्या येत असल्याने टॅक्सपेयर्सना रिटर्न भरण्यात (ITR Filing Last Date ) डचणी येत होत्या.

सीबीडीटीने एका वक्तव्यात म्हटले की, विवाद से विश्वास अ‍ॅक्ट अंतर्गत आवश्यक फॉर्म 3 जारी करणे आणि यामध्ये सुधारणा करण्यात येत असलेल्या समस्येमुळे कोणत्याही अतिरिक्त रक्कमेशिवाय पैसे भरण्याची शेवटची तारीख वाढवून 30 सप्टेंबर करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

अर्थमंत्र्यांनी Infosys ला दिला 15 सप्टेंबरपर्यंतचा वेळ

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन पोर्टलमधील तांत्रिक समस्यांवर काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि देशातील प्रमुख सॉफ्टवेयर सर्व्हिस कंपनी इन्फोसिसचे एमडी आणि सीईओ सलिल पारेख यांची भेट झाली होती.

यावेळी अर्थमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत पारेख यांच्या भेटीदरम्यान हा मुद्द उपस्थित केला की,
सुमारे अडीच महिने उलटल्यानंतर सुद्धा पोर्टल व्यवस्थित काम का करत नाही.
अर्थमंत्र्यांनी पोर्टलमधील समस्या दुरूस्त करण्यासाठी इन्फोसिसला 15 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे.

Web Title : ITR Filing Last Date | government extends deadline for filing of various forms under income tax act details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News