त्वरा करा ! ‘ITR’ दाखल करण्यासाठी 10 दिवस ‘शिल्लक’, वेळेत न भरल्यास ‘इतका’ दंड

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – आयटीआर भरण्यासाठीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2019 असणार आहे. म्हणजे आता तुमच्याकडे आयटीआर दाखल करण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. कोणत्याही दंडाशिवाय आयकर भरायचा असल्यास ही अंतिम तारीख अत्यंत महत्वाची आहे.

फक्त 7 मिनिटात भरा ITR –
आयकर विभागाने करदात्यांसाठी विशेष सुविधा सुरु केली आहे. करदाते ई – फायलिंगच्या माध्यमातून रिटर्न फाइल करु शकतात. https://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर तुम्ही आयटीआर भरु शकतात. याला e-filing lite असे नाव देण्यात आले आहेे.

31 ऑगस्टनंतर भरावा लागणार दंड –
31 ऑगस्ट आधी आयटीआर दाखल न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुम्ही 31 ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत आयटीआर भरल्यास तुम्हाला 5000 रुपये दंड भरावा लागेल. तर 1 जानेवारी 2020 ते 30 मार्च 2020 पर्यंत दंड भरल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. ज्याचे उत्पन्न 5 लाख रुपये असल्यास दंड म्हणून 1000 रुपये भरावा लागू शकतात.

ITR भरल्यानंतर यूजर्सला याला वेरिफाय करावे लागेल. जर तुम्ही फॉर्म वेरिफाय केला नसेल तर आयकर नियमांनुसार हे वैध मानले जाणार नाही. रिटर्न भरल्यानंतर आधार OTP तुम्हाला भरावा लागेल. यासाठी मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. यानंतर तुमचे आयकर रिटर्न वेरिफाय होतील. याशिवाय तुम्ही एटीएम, बँक खाते, डीमॅट खाते आणि नेट बँकिंगच्या आधारे देखील आयटीआर वेरिफाय करु शकतात.

तुमचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा आधिक असेल तर तुम्हाला आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. जेष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 3 लाख रुपये आणि 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये असणार आहे.