ITR Filing Verification | ITR व्हेरिफाय कसे करावे? या 6 पद्धतीने करू शकता आपला इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफाय, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ITR Filing Verification | इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याच्या प्रक्रियेत शेवटचा टप्पा व्हेरिफाय करण्याचा असतो. आयटीआर भरण्याच्या 120 दिवसांच्या आत व्हेरिफाय न झाल्यास तुमचा आयटीआर अमान्य मानला जातो. इन्कम टॅक्स पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, आयटीआर व्हेरिफाय करण्याच्या एकुण 6 पद्धती आहेत. यापैकी 5 पद्धती ऑनलाईन आणि तर 1 पद्धत ऑफलाईन आहे. (ITR Filing Verification)

 

आयटीआर व्हेरिफाय करण्याच्या सर्व 6 पद्धती जाणून घेवूयात…

1. आधार आधारित OTP द्वारे
आधार आधारित वन-टाइम पासवर्ड (OTP) चा वापर करून आयटीआर व्हेरिफाय करण्यासाठी हे आवश्यक आहे की तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असावा. सोबतच तुमचे पॅनसुद्धा त्या आधारसोबत लिंक असावे.

 

आता या ई-व्हेरिफाय पेजवर जा आणि आधारसोबत रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपीसह ई-व्हेरिफाय करण्याचा पर्याय निवडा. आणि सुरू ठेवा वर क्लिक करा. येथे एक नवीन विंडो स्क्रीन येईल, ज्यावर लिहिलेले असेल की, मी माझे आधार माहिती व्हॅलिडेट करण्यासाठी सहमत आहे. या चेक बॉक्सवर क्लिक करा आणि नंतर आधार ओटीपी जेनरेट करावर क्लिक करा. (ITR Filing Verification)

 

क्लिक करताच तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर 6 अंकी ओटीपी येईल. आधार कार्डसंबंधीत मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी केवळ 15 मिनिटांसाठी व्हॅलिड असेल. ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये भरा आणि सबमिटवर क्लिक करा. यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर तुमचा आयटीआर व्हेरिफाय होईल.

 

2. बँक खात्याद्वारे
बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (ईव्हीसी) जेनरेट करून सुद्धा आयटीआर व्हेरिफाय करू शकता. यासाठी एक प्री-व्हेरिफाईड बँक खाते असावे, ज्याद्वारे ईव्हीसी जनरेट करता येईल. इन्कम टॅक्स रिफंड मिळवण्यासाठी बँक खात्याचे प्री-व्हेरिफिकेशन आवश्यक आहे.

ई-व्हेरिफाय पेजवर जाऊन बँक खात्याद्वारेचा पर्याय निवडा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा. क्लिक करताच ईव्हीसी जनरेट होईल आणि बँक खात्याशी रजिस्टर्ड मोाबईल नंबर आणि ईमेल आयडीवर तो पाठवला जाईल. हा ईव्हीसी दिलेल्या बॉक्समध्ये भरा आणि ई-व्हेरिफायवर क्लिक करा. अशाप्रकारे बँक खात्याद्वारे आयटीआर व्हेरिफाय होईल.

 

3. डिमॅट खात्याद्वारे
डिमॅट खात्याद्वारे आयटीआर ई-व्हेरिफाय करण्याची प्रक्रिया एकदम बँक खात्यद्वारे व्हेरिफाय करण्याच्या प्रक्रियेसारखी आहे. ई-व्हेरिफाय पेजवर जाऊन डिमॅट खात्याद्वारे चा पर्याय निवडा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा. क्लिक करताच ईव्हीसी जनरेट होईल, जो प्री-व्हेरिफाईड डिमॅट खात्यासोबत रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर पाठवला जाईल. हा ईव्हीसी दिलेल्या बॉक्समध्ये भरा आणि ई-व्हेरिफायवर क्लिक करा. अशाप्रकारे डिमॅट खात्याद्वारे आयटीआर व्हेरिफाय होईल.

 

4. ATM द्वारे
इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC) एटीएम कार्डद्वारे सुद्धा जनरेट करता येऊ शकतो. मात्र ही सुविधा सध्या अ‍ॅक्सिस बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम कार्डपर्यंत मर्यादित आहे.

 

सर्वप्रथम बँकेच्या एटीएमवर जा आणि कार्ड स्वाईप करा. यानंतर इन्कम टॅक्स फायलिंगसाठी पिन चा पर्याय निवडा.
यानंतर बँक खात्याशी रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ईव्हीसी येईल, जो केवळ 72 तासांसाठी वैध असेल.
यानंतर इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ई-व्हेरिफाय पेज उघडा.

 

येथे आयटीआर व्हेरिफिकेशनसाठी माझ्याकडे अगोदरच इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड आहे
चा पर्याय निवडा आणि EVC नोंदवा. अशाप्रकारे एटीएम कार्डद्वारे आयटीआर व्हेरिफाय होईल.

5. नेट बँकिंगद्वारे
ई-व्हेरिफाय पेजवर नेट बँकिंगद्वारेचा पर्याय निवडा आणि सुरू ठेवा पर्यायावर क्लिक करा.
यानंतर ती बँक निवडा, जिच्या नेट बँकिंगद्वारे आयटीआर व्हेरिफाय करायचे आहे.
नंतर सुरू ठेवा वर क्लिक करा. आता बँक खात्याच्या नेट बँकिंगमध्ये लॉग-इन करा.
येथे प्राप्तीकर ई-व्हेरिफायचा पर्याय निवडा, जो साधारणपणे टॅक्स मेनू अंतर्गत मिळतो.

 

यानंतर इन्कम टॅक्स विभागाच्या पेजवर रिडायरेक्ट केले जाईल.
आता संबंधित आयटीआर फॉर्मवर जा आणि ई-व्हेरिफायवर क्लिक करा. तुमचा आयटीआर यशस्वीपणे ई-व्हेरिफाय होईल.

 

6. ऑफलाईन पद्धतीने
जर तुम्ही वर सांगितलेल्या पाचही ऑनलाइन पद्धतीने आयटीआर ई-व्हेरिफाय करू शकला नाहीत,
तर ऑफलाईन सुद्धा तो व्हेरिफाय करू शकता.
यासाठी ITR-V फॉर्मची सही केलेली कॉपी इन्कम टॅक्स विभागाला स्पीड पोस्टाद्वारे पाठवावी लागेल.

 

आयटीआर-व्ही फॉर्मवर निळ्या शाईच्या पेनने सही करा आणि तो CPC, Post Box No – 1,
ElectronicCity Post Office, Bangalore-560100, Karnataka, India या पत्त्यावर स्पीड पोस्ट करा.
इन्कम टॅक्स विभाग हा फॉर्म मिळताच तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर त्याचे नोटिफिकेशन पाठवले.
लक्षात ठेवा की, आयटीआर-व्ही फॉर्मच्या ई-फायलिंगच्या तारीखेपासून 120 दिवसांच्या आत वर सांगितलेल्या पत्त्यावर पोहचणे आवश्यक आहे.

 

Web Title :- ITR Filing Verification | itr filing verification here is six ways you can verify your income tax return

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने 1 लाखांची सोन्याची कंठी माळ नेली चोरुन

 

Metro Car Shed | CM एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, आरे कारशेडच्या कामावरील बंदी उठवली

 

Global Economic Recession | कोरोनानंतर आता महागाईचा आगडोंब, कोट्यवधी लोक होतील गरीब, IMF ने दिला हा इशारा