ITR Update | शेअर बाजारात झालेल्या नुकसानीवर टॅक्स सूट मिळेल का ?, काय सांगतो प्राप्तीकर कायदा ? एक्सपर्टकडून जाणून घ्या पूर्ण गणित

0
86
ITR Update itr update can you set off losses in stock market to reduce your tax liabilities
File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ITR Update | तोट्यासाठी कोणीही शेअर बाजारात गुंतवणूक करत नाही, पण इथे पैसे गुंतवून रिटर्न मिळवणे हा अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्हाला नफा झाला तर त्यावर कर भरावा लागेल, पण तोटा झाल्यास करमाफीचा लाभही मिळतो का ? (ITR Update)

 

या प्रश्नाचे उत्तर कर तज्ज्ञांना विचारले असता प्राप्तीकर कायद्यातील अनेक रंजक नियमांची माहिती मिळाली. प्राप्तीकर कायदा सांगतो की, एखाद्या आर्थिक वर्षात शेअर बाजारात तुमचे नुकसान झाले असेल, तर त्याची भरपाई कराची गणना करताना करता येते. तुमचा करातील तोटा समायोजित करून तुम्ही तुमचे दायित्व कमी करू शकता. (ITR Update)

 

कशी मिळते कर सूट

प्राप्तीकर विषयातील जाणकार बळवंत जैन स्पष्ट करतात की एका आर्थिक वर्षात शेअर बाजारातील तोटा बाजारातील इतर नफ्यासह समायोजित केला जाऊ शकतो. हे समजून घेण्यासाठी, सर्वप्रथम, कर कसा आकारला जातो हे जाणून घ्या. शेअर बाजारातून मिळणार्‍या कमाईवर दोन प्रकारे कर आकारला जातो, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. हे बाजारातील गुंतवणुकीच्या वेळेनुसार ठरवले जाते.

जर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल लॉस झाला असेल, म्हणजे दीर्घ कालावधीत गुंतवणुकीच्या स्टॉकमधील तोटा, तर त्याचे समायोजन केवळ दीर्घ कालावधीच्या भांडवली नफ्यासोबत केले जाऊ शकतो. परंतु, जर तुम्हाला शार्ट टर्म कॅपिटल लॉस म्हणजे अल्पकालीन भांडवली तोटा झाला असेल, तर त्याची भरपाई दीर्घकालीन आणि अल्प कालीन गुंतवणुकीतून कमावलेल्या नफ्यात समायोजित करून केली जाऊ शकते.

 

आठ वर्षांपर्यंत मिळतो समायोजनाचा लाभ

प्राप्तीकर विभाग मार्केटमध्ये तोटा झालेल्या करदात्यांना त्यावर कर सूट मिळविण्यासाठी दिर्घ कालावधी देतो. त्याच आर्थिक वर्षात झालेल्या नफ्यातून तुमचा तोटा भरून काढता आला नसेल, तर तो तुमच्या नफ्यातून पुढील आठ आर्थिक वर्षांसाठी समायोजित केला जाऊ शकतो. मात्र, यासाठी अट अशी आहे की, करदात्याने दरवर्षी रिटर्न वेळेवर भरावा.

 

नुकसान ट्रॅक करण्याचे इतरही फायदे

बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही शेअर बाजारात तुमचा नफा-तोटा व्यवस्थितपणे ट्रॅक केला तर त्याचे अनेक फायदे होतील.

तुम्ही कोणत्याही एका शेअरमधील तोटा दुसर्‍या शेअरमध्ये झालेल्या नफ्यातून भरून काढण्यास सक्षम असाल.
यामुळे बाजारातून मिळणार्‍या निव्वळ नफ्यावरच कर देय असेल.

तुमचे नुकसान करणारे स्टॉक्स तुम्ही ओळखू शकाल.

असे नुकसान करणारे स्टॉक ओळखून तुमच्या पोर्टफोलिओमधून बाहेर काढणे सोपे होईल.

 

Web Title : – ITR Update | itr update can you set off losses in stock market to reduce your tax liabilities

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा