ITR Verification | जर केले नसेल व्हेरिफिकेशन तर रद्द होईल तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न, जाणून घ्या पडताळणीच्या पद्धती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ITR Verification | तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय, प्रत्येकाने कर दायित्व वेळेवर पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. मात्र यासाठी फक्त आयटीआर फाईल करणे पुरेसे नाही. आयटीआर भरल्यानंतर (ITR Filing) त्याची पडताळणीही (ITR Verification) करावी लागते. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने प्राप्तीकर रिटर्न (ITR) पडताळण्याची अंतिम मुदत 120 दिवसांवरून 30 दिवसांवर आणली आहे. हा नियम 1 ऑगस्ट 2022 रोजी आणि नंतर विलंब शुल्कासह दाखल केलेल्या सर्व आयटीआरला लागू होईल. मात्र, ITR दाखल करण्याच्या तारखेपासून 31 जुलै 2022 पर्यंत 120 दिवसांची अंतिम मुदत पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. (ITR Verification)

 

आयटीआर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या आयटीआरची पडताळणी अनिवार्य आहे. मात्र, जर एखादी व्यक्ती नियोजित तारखेपूर्वी त्याचे आयटीआर (Income Tax Return) सत्यापित (ITR Verification) करण्यात अयशस्वी ठरली, तर तो विलंबाचे कारण सांगून कर विभागाकडे पुन्हा विनंती करू शकतो. ही विनंती मंजूर झाल्यास, तुमच्या परताव्याची पडताळणी केली जाईल. येथे आम्ही तुम्हाला आयटीआर व्हेरिफाय करण्याचा सोपा मार्ग सांगत आहोत. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही हे काम ऑनलाइन करू शकता.

 

1. आधार ओटीपी वापरून करा ई – व्हेरिफाय

www.incometax.gov.in वर लॉग इन करा आणि तुमच्या ई – फायलिंग खात्यात लॉग इन करा.
’ई – फाईल’ टॅब अंतर्गत ’इन्कम टॅक्स रिटर्न’ वर क्लिक करा.
’ई – व्हेरिफाय रिटर्न’ वर क्लिक करा.
’आधार आणि ओटीपी वापरून ई – व्हेरिफिकेशन’ हा पर्याय निवडा.
स्क्रीनवर दिसणार्‍या विंडोवर ’मी माझे आधार तपशील प्रमाणित करण्यासाठी सहमत आहे’ वर क्लिक करा.
’जनरेट आधार ओटीपी’ बटणावर क्लिक करा.
तुम्हाला नोंदणीकृत फोन नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल.
दिलेल्या बॉक्समध्ये मिळालेला ओटीपी टाका आणि ’Submit’ वर क्लिक करा.
सबमिशन केल्यावर, तुमचा आयटीआर सत्यापित केला जाईल.

 

2. नेट बँकिंग वापरून करा ई – व्हेरिफाय

www.incometax.gov.in ला भेट द्या आणि तुमच्या ई – फायलिंग खात्यात लॉग इन करा.
’ई – फाईल’ टॅब अंतर्गत ’इन्कम टॅक्स रिटर्न’ वर क्लिक करा.
’ई – व्हेरिफाय रिटर्न’ वर क्लिक करा.
’थ्रू नेट बँकिंग’ निवडा आणि ’सुरू ठेवा’ वर क्लिक करा.
ज्या बँकेद्वारे तुम्हाला आयटीआर सत्यापित करायचा आहे ती बँक निवडा आणि ’सुरू ठेवा’ वर क्लिक करा.
तुम्हाला बँकेच्या नेट बँकिंग पृष्ठावर रिडायरेक्ट केले जाईल.
’तुमच्या बँकेच्या नेट बँकिंग वेबसाइटवरून ई – फायलिंग खात्यात लॉग इन करा’ वर क्लिक करा.
आता तुम्हाला आयटीआर पोर्टलवर नेले जाईल.
तुमच्या आयटीआर फॉर्ममध्ये ’ई – व्हेरिफाय’ वर क्लिक करा.

 

3. आयटीआर 2021 – 22 ऑफलाईन कसे व्हेरिफाय करावे ?

आयटीआर वेबसाइटला भेट द्या आणि तुमच्या आयटीआर पडताळणी फॉर्मची प्रिंट आउट घ्या.
फॉर्मवर स्वाक्षरी करा आणि सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी), बेंगळुरू येथे पाठवा.
CPC द्वारे ITR-V प्राप्त झाल्यानंतर, त्याची पडताळणी केली जाईल.
पडताळणी यशस्वी झाल्यास तुम्हाला मेल आणि मेसेज येईल.

 

Web Title : – ITR Verification | know all ways to verify income tax return

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा