‘नोटबंदी हा दहशतवादी हल्ला, त्यामुळेच भारताची अर्थव्यवस्था उध्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय लागू केला होता. या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “नोटबंदी या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त झाली. अनेकांना आपले जीव गमवावे लागले. लाखो लघुउद्योग नष्ट झाले. लाखो भारतीय असे आहेत जे बेरोजगार झाले. या निर्घृण हल्ल्यामागील आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही.” असं राहुल गांधी म्हणतात. या ट्विटमध्ये राहुल गांधींनी #DeMonetisationDisaster असा हॅशटॅगही वापरला आहे.

Visit : Policenama.com