काँग्रेस नेत्याने अप्रत्यक्षपणे व्यक्त केली CM बनण्याची इच्छा, संजय राऊत म्हणाले – ‘अडीच वर्षात मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा अफवा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी म्हटले की, अडीच वर्षानंतर शिवसेनेचा सीएम बदलला जाईल, ही चर्चा पूर्णपणे अफवा आहे. त्यांनी म्हटले की, जेव्हा तीन पक्षांनी मिळून सरकार बनवले, तेव्हा आम्ही निर्णय घेतला होता की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 5 वर्षासाठी मुख्यमंत्री (CM) असतील. आता जर कुणी याबाबत बोलत असतील तर हे दुसरे काहीही नसून केवळ खोटे आणि अफवा आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Congress President Nana Patole) यांनी अप्रत्यक्षपणे सीएम बनण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी एका सभेत म्हटले की, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मी सुद्धा मुख्यमंत्री बनू शकतो. मात्र, त्यांच्या वक्तव्यावर एनसीपी नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांनी म्हटले की, स्वप्न पाहण्याचा सर्वांना अधिकार आहे.

संजय राऊत यांनी म्हटले, हे विलिनीकरण नव्हे तर 3 पक्षांची आघाडी आहे आणि सर्वांना या गोष्टींसाठी स्वातंत्र्य आहे की, त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करावा किंवा पक्ष मजबूत करावा. प्रत्येक निवडणूक एकत्र लढण्याचे आमचे ठरलेले नाही. स्थानिक निवडणुकीत स्थानिक नेते निर्णय घेतात. आम्ही केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections) रणनीती बनवतो.

दरम्यान, संपूर्ण प्रकरणावर भाजपा नेते राम कदम (BJP leader Ram Kadam) यांनी दावा केला आहे.
की, महाविकास अघाडी सरकारमध्ये ( Mahavikas Aghadi government) सर्वकाही ठिक नाही.
त्यांनी म्हटले की, काँग्रेस उद्धव सरकारच्या कामावर नाराज आहे.
भाजपाच्या दाव्यावर नवाब मलिक यांनी पलटवार करत म्हटले की, महाविकास अघाडी सरकार 5 वर्ष नव्हे तर 25 वर्ष चालेल.
महाराष्ट्रात जी चांगली कामे होत आहेत, त्यामुळे भाजपा (BJP) अस्वस्थ आहे.

Wab Title :- its a rumour that shiv sena cm will-be replaced after 2-5 years says sanjay raut

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा