…म्हणून गृृहमंत्र्यांनी विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला केला विरोध

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउननंतर सुमारे दोन महिन्यांनी देशांतर्गत विमान वाहतूक 25 मे पासून नियंत्रित पद्धतीने सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही उत्सुकता आहे. मात्र, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. ’रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसते थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे.’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.

राज्यात कोरोना कहर कमी होत नसताना ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच, असेही शमुखांनी नमूद केले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातली विमान वाहतूक 25 मार्चपासून बंद करण्यात आली होती. सुरुवातीला सरकार देशांतर्गत वाहतूक 33 टक्के क्षमतेने पूर्वपदावर आणणार आहे. त्यासाठी विशेष नियमावलीही सरकारने जाहीर केलेली आहे. देशाबाहेर अडकलेल्या नागरिकांसाठी सरकारने वंदे भारत मिशन सध्या सुरू आहे. पण आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीस मात्र सरकारने अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही.