सारा अली खानशी जवळीक करणार्‍या ‘या’ अभिनेत्याचा ‘धडक’ गर्ल जान्हवी कपूर सोबत सिनेमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा, अभिनेता अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम स्टार सुपरहिट सिनेमा दोस्ताना रिलीज होऊन तब्बल ११ वर्षे झाली आहेत. आता या सिनेमाचा सिक्वल येत आहे. करण जोहरने याबाबत एक इंस्टाग्राम पोस्ट टाकून या सिनेमाचा सिक्वलची घोषणा केली आहे. या सिनेमात अभिनेत्री जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यन एकत्र दिसणार आहेत. या दोघांव्यतिरीक्त या सिनेमात तिसरा आणखी एक कलाकार असणार आहे. परंतु त्याविषयी घोषणा होणं अद्याप बाकी आहे. महत्त्वाची बाब अशी की, हा तिसरा कलाकार या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलं होतं. आता दोस्ताना 2 ची जबाबदारी कॉलिन डी कुन्हा (collin D Cunha) यांना मिळाली आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहरचं प्रॉडक्शन हाऊस धर्मा मूव्हीजच्या बॅनरखाली होणार आहे.

आज सकाळीच करण जोहरने या सिनेमाबाबत घोषणा केली आहे. आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये करण जोहर म्हणतो की, “मी दोस्ताना फ्रेंचाईजीला कार्तिक आणि जान्हवी सोबत पुढे घेऊन जाण्यासाठी खूप उत्साहीत आहे. पुन्हा एकदा पडद्यावर देशी मुला-मुलींसोबत पागलपण करण्यासाठी मी आतुर झालो आहे. कार्तिक सोबतचा धर्मा प्रॉडक्शनचा हा पाहिलाच सिनेमा आहे. आम्ही एक नवीन चेहराही सादर करत आहोत. कॉलिन डी कुन्हा दोस्ताना 2 मधून दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करत आहेत.”

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यन या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. कार्तिक सध्या सारा अली खानसोबत लव आजकल 2 या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिजी आहे. जान्हवी बद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या रुही-अफ्जा आणि कार्गिल गर्ल ची शुटींग करत आहे. हे दोन्हीही सिनेमे पुढील वर्षी रिलीज होणार आहेत.

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद

दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा भगवा रंग योग्यच : रामदास आठवले

‘जय श्रीराम’ न बोलणाऱ्या तरुणास मारहाण

बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून दलित, वंचितांच्या जागा बळकावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Loading...
You might also like