जेडे हत्या प्रकरणाच्या निकालानंतर छोटा राजनची ‘इट्स ओके’ प्रतिक्रिया

मुंबई : वृत्तसंस्था
जे डे हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या छोटा राजनने ‘इट्स ओके’ म्हणत या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जे डे हत्याप्रकरणी बुधवारी शिक्षा सुनावलेल्या आठ दोषीना अटक करण्यात आली. राजन, शार्पशूटर, रोहित तांगप्पा, उर्फ ​​सतीश काल्या (42), अरुण डाके (32), अनिल वाघमोडे (42), मंगेश आगवणे (31), सचिन गायकवाड (33), अभिजीत शिंदे (32), आणि निलेश शेडगे (वय 40) अशी त्यांची नावे आहेत.

जे डे हत्येप्रकरणी संघटित गुन्हेगारीचा भाग म्हणून कट रचणे, हत्येचा कट करणे आणि हत्या करणे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. उत्तराखंडमधील दीपक सिसोदिया या नवव्या आरोपीला निर्दोष मुक्त केले,परंतु त्याला राजन आणि इतरांसोबत महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हेगाराविरोधी कायद्यानुसार (मोक्का) गुन्हेगारी कट रचल्याबद्दल दोषी ठरविले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी, विनोद असरानी, ​​प्रलंबित खटल्यात मृत्यू झाला आणि दोन अजूनही फरार आहेत.