#Pulwama terror attack आता वेळ आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची : अमोल कोल्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्यावर अनेक कलाकारांनीही संताप व्यक्त केला आहे. आता या हल्ल्याच्या निषेधार्थ स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनीही संताप व्यक्त केला आहे.

पुण्यातील लाल महालात लपलेल्या शाहिस्तेखानाच्याच फौजेत घुसून त्याला अद्दल घडवणारे महाराज, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात तशी कारवाई केली जाईल अशी अपेक्षा एक शिवभक्त म्हणून मी करतो, असं मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त समाज प्रबोधनात अमोल कोल्हे यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्यावर संताप व्यक्त करत त्यांनी आपले मत मांडले. तसेच या कार्यक्रमात त्यांनी सत्ताधारांवर टीका करत म्हणाले की, सत्ता असताना सत्तांध न होणं, हा महाराजांनी सर्वात पहिला आदर्श घालून दिला. आजच्या काळात हे अनेकांना लागू पडत असेल. सत्ता हातात असताना माणसानं कधी सत्तांध व्हायचं नसतं, रयतेच्या कल्याणाच राज्य राबवायचं असतं. महाराजांच्या आदर्शाची आठवण करून देत, रयतेच्या कल्याणाच राज्य राबवण्याचा अप्रत्यक्षपाने सल्ला देत सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला.