वर्षभरापुर्वीचा ड्रेस घालून भारतात आली ट्रम्प यांची मुलगी इवांका, किंमत ऐकाल तर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारतीय दौर्‍यासाठी भारतात दाखल झाले आहेत. सोमवारी सकाळी ट्रम्प आपली पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांकासोबत अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: विमानतळावर जाऊन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत केले. या खास प्रसंगी डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया आणि इवांका यांच्यावर लोकांची नजर खिळून राहिली. दरम्यान, एक विशेष गोष्ट फारच दुर्लक्षित केली आहे.

भारत दौर्‍यावर दुसऱ्यांदा आलेल्या इवांकाने लाईट ब्लू आणि लाल रंगाचा मिडी फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला होता. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की इव्हांकाचा ड्रेस जवळजवळ एक वर्ष जुना आहे. इवांका सप्टेंबर 2019 मध्ये या ड्रेसमध्ये दिसली आहे. गेल्या वर्षी अर्जेंटिनाच्या ट्रिप दरम्यान तिने हा फ्रॉक सूट परिधान केला होता. या ड्रेसची किंमत सुमारे 1,71,331 रुपये (यूएस $ 2,385) असल्याचे म्हटले जाते. अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर तिची हेअरस्टाईल थोडी वेगळी होती. त्यावेळी इवांकाने बेबी कट केला होता. आज तिचे केस थोडे मोठे झाले आहेत.

ट्रम्प कुटुंबाचा पहिला लुकही विमानतळावर पहिला गेला. डोनाल्ड ट्रम्पने काळ्या रंगाच्या सूटसह लेमन यलो कलरबरोबर टाय टीमअप केला होता. ट्रम्पच्या टायचा रंग देखील एक वेगळी कथा सांगतो. लेमन येलो रंग पाश्चात्य देशांमध्ये आशेचे प्रतीक मानला जातो. याचाच अर्थ ट्रम्प यांना भारताकडून मोठ्या अपेक्षा असतील.

दरम्यान, मेलेनियाचा पांढरा जंपसूट अमेरिकेच्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर हर्वे पियरेने डिझाइन केला आहे. डिझायनरने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये ब्रोकेट फॅब्रिक पट्ट्याविषयी सांगितले आहे की, जो मेलेनियाने कमरेवर बांधला आहे. पियरे यांच्या म्हणण्यानुसार हा कमरबंद पट्टा हा भारतीय कपड्यांचा एक भाग आहे जो 20 व्या शतकात खूप लोकप्रिय होता. पॅरिसमधील त्याच्या एका मित्राने त्याला या विशिष्ट ड्रेसबद्दल सांगितले. हिरव्या रंगाचे हे रेशीम फॅब्रिक सिल्क धागाने डिझाइन केले गेले आहे. पट्ट्याच्या बॉर्डरवर केलेले भरतकाम त्याला खास बनवते.