Coronavirus : कोरोनापासून बचावासाठी ‘या’ पद्धतीनं मदत करणार ट्रम्प सरकार, इवांका ट्रम्पनं केलं ट्विट

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. आता या महामारीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पने प्रतिक्रिया दिली आहे. इवांकाने ट्विट करून म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मजबूत पाठींब्याने कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी कायदा संमत करण्यात आला आहे.

या अंतर्गत कोविड 19 टेस्ट फ्री असेल. अमेरिकन वर्कर्ससाठी पेड सुट्टीची तरतुद आहे. बेरोजगार विमा व लघु व्यापार सुरक्षा आणि मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रभाव पाहता विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सरकारी यंत्रणांद्वारे आयोजित शैक्षणिक कर्जावर व्याज माफ केले आहे.

यानंतर इवांका यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे ते ट्विट रिट्विट केले, ज्यामध्ये ट्रम्प यांनी एक व्हिडिओ शेयर करून लिहिले होते की, युनायटेड स्टेट इटलीवर प्रेम करते.