भारतीयांच्या Creativity वर इवांका ट्रम्प ‘फिदा’, फोटो केला ‘ट्विट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच कुटूंब दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते. अहमदाबाद, दिल्ली, आग्रा या ठिकाणी ट्रम्प यांनी दोन दिवसात भेट दिली. ट्रम्प यांच्यासह चर्चा झाली ती त्यांची कन्या इवांका हिची. इवांकाच्या फोटोंचे मीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते थेट आता इवांकापर्यंत पोहोचले असून त्याचं कौतुकही तिने केलं आहे.

ट्रम्प यांची पत्नी मेलानिया, इवांका हे भारत दौऱ्यावर आले होते. इवांका ही डोनाल्ड ट्रम्प यांची सल्लागार आहे. इवांकाने त्यावेळी काढलेले काही फोटो इवांकाने शेअर केले. डोनाल्ड ट्रम्प हे भारतात येण्याअगोदर अनेक मीम्स आणि मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाले होते. भारतात इवांका यांच्या मीम्सनी धुमाकूळ घातला. आता हेच मीम्स स्वत: इवांकाने शेअर केले आहेत. अमेरिकेत परतल्यानंतर तिने ट्विटरवरून मीम्सचे फोटो ट्वीट केले आहेत.

इवांकाने भारतीय लोकांच्या या क्रिएटीव्हीटीचे कौतुक केलं आहे. तसेच तिने भारतामध्ये तिने खूप सारे मित्र हि बनवले आहेत. असं तिने ट्विट केलं आहे.इवांका सामाजिक जीवनात सक्रीय असून ट्रम्प यांच्या सल्लागार म्हणून काम करते. याआधी दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमासाठी इव्हांका भारतात आली होती. तेव्हा पंतप्रधान मोदींसोबत काढलेला एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे. बॉलिवू़ड अभिनेता दिलजित दोसांजसोबत मॉर्फ केलेला फोटोही तिनं शेअर केला आहे. हा अनुभव कधीही विसरणार नाही अशी प्रतिक्रिया इव्हांकाने दिली आहे.