‘त्या’ व्हिडीओबद्दल इवांका ट्रम्प यांनी मानले PM मोदींचे आभार, म्हणाल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात कोरोना एक मोठं संकट बनलं आहे, जगभरातील कोरोनाग्रस्त देशात लॉकडाऊन आहे. भारतात देखील 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना घरातच राहण्याचे आणि मन शांत ठेवण्याचे आवाहन करत आहेत. याच दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीने म्हणजेच इवांका ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे.

इवांका ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे, त्यात त्यांनी लिहिले आहे की पंतप्रधान मोदी धन्यवाद, हे खरंच खूप छान आहे. यात त्यांनी पंतप्रधान मोदींचे ट्विट रिट्विट केले आहे.

पंतप्रधान मोदींनी आज योग निद्राचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, जेव्हा कधी वेळ मिळतो मी आठड्यातून एक – दोनदा योग निद्राचा अभ्यास करतो, याने शरीराचे आरोग्य आणि मन प्रसन्न राहते. याने ताण आणि चिंता देखील कमी होते. इंटरनेटवर तुम्हाला योग निद्राचा व्हिडिओ मिळेल, इंग्रजी आणि हिंदीमध्ये मी व्हिडिओ शेअर करत आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे इवांका ट्रम्प घरुनच काम करणे पसंत करत आहेत. अमेरिकीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि वरिष्ठ सल्लागार इवांका ट्रम्प यांनी नुकतेच अमेरिकेत ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्याची भेट घेतली होती, जे कोरोना व्हायरसच्या चाचणीत पॉजिटिव्ह असल्याचे आढळले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like