ताजमहलाचं सौंदर्य पाहून इवांका ट्रम्प झाली ‘फिदा’, कॅमेऱ्यात कैद केले ‘सुंदर’ क्षण

आग्रा : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदाबादवरून ट्रम्प हे दुपारी साडेचारच्या सुमारास आग्रा येथे आले होते. त्यावळी त्यांच्यासोबत पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणी जावई कुशनरसोबत होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते सर्वजण ताजमहलमध्ये दाखल झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्याची पत्नी मेलेनिया ट्रम्प हे ताजमहालच्या प्रेमात पडले. ताजमहालच्या परिसरातील शांतता आणि ताजच्या सौंदर्याने ते भारावून गेले.

ट्रम्प यांची मुलगी इवांकाने पती कुशनरसोबत ताजमहाल बघितला. तिलाही ताजमहल आवडला. आयुष्यातील अतिशय सुंदर क्षण तिने पतीसोबत फोटोत कैद केला. तिनेही ताजमहाल परिसराचा पतिसोबत फेरफटका मारला. इवांका शॉर्ट गाऊमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. इवांका आणि तिच्या पतीने ताजमहाल पहाताना ताजमहालच्या बाबतीतील बारकावे समजावून घेतले.

इवांका आणि तिचा पती कुशनर यांनी एकमेकांच्या हातात हात घालून ताजमहालचा फेरफटका मारला. या दोघांनी ताजमहालच्या कारंजांसमोर उभारून आपले फोटो काढून घेतले. ताजमहालमध्ये आल्यानंतर ही जोडी वेगळीच दिसत होती. या दोघांनी ताजमहालची माहिती आणि इतिहास जाणून घेतला. तसेच या दोघांनी त्यांच्यासोबत आलेल्या लोकांसोबत डायना बाकावर बसून फोटो काढले.