जे.पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. नड्डा हे माजी केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत. जानेवारी 2019 मध्येच सध्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा अध्यक्षपदा कार्यकाल पुर्ण झाला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे त्यांचा कार्यकाल वाढविण्यात आलेला आहे.

अमित शहा यांनी 13 आणि 14 जून रोजी दिल्‍ली येथे देशातील सर्व प्रदेशाध्यक्षांची तसेच प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली. 13 आणि 14 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौर्‍यावर होते. त्यामुळे बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय घेण्यात आला नव्हता. आज (सोमवार) अखेर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी जे.पी. नड्डा यांची निवड झाली आहे. आता  हिमाचल प्रदेशचे असलेले जे.पी. नड्डा यांचा लोकसभा निवडणुकीतील विजयात देखील मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली आहे.

उत्‍तरप्रदेशमध्ये भाजपला यश मिळवून देण्यात महत्वाचे योगदान
राजकीय पंडितांनी उत्‍तर प्रदेशात भाजपला कमी जागा मिळणार असे भाकित केले होते. मात्र, जे.पी. नड्डा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उत्‍तर प्रदेशात संघटना भरपुर मजबुत केली होती. त्यामुळेच उत्‍तर प्रदेशमध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. सन 2014 च्या तुलनेत सन 2019 मध्ये भाजपच्या उत्‍तरप्रदेशातुन जागा कमी झाल्या. मात्र, त्याचा फारसा फरक भाजपला जाणवला नाही.