राम मंदिरासाठी आजींचा 28 वर्ष उपवास

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अयोध्येत प्रभू ऐतिहासिक राममंदिराच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे. अयोध्येत भव्य राम मंदीर उभारले जावे अशी अनेकांची इच्छा होती. अशीच एक इच्छा मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये राहणार्‍या या आजींचे मनात होती. त्यासाठी त्यांनी गेल्या 28 वर्षांपासून संकल्प करीत उपास केला आहे. उर्मिला चतुर्वेदी असे त्यांचे नाव आहे.

मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये राहणार्‍या उर्मिला चतुर्वेदी यांनी 28 वर्षांपुर्वी राम मंदीर निर्माणाबाबत एक संकल्प केला होता. उर्मिला यांनी अन्न त्याग करण्याचा संकल्प केला असून जोपर्यंत राम मंदिर बांधण्यास सुरुवात होणार नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही असा निश्चय त्यांनी केला होता. आता 5 ऑगस्ट रोजी देशातील भव्य राम मंदिराचा अयोध्येत भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.

त्यामुळे उर्मिला यांचा संकल्प पूर्ण होणार आहे. 1992मध्ये बाबरी मशीद विध्वंस प्रकरण घडले त्यावेळी उर्मिला चतुर्वेदी 53 वर्षांच्या होत्या. उर्मिला यांनी अन्नत्याग केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना हा संकल्प सोडण्यासाठी अनेकदा विनवण्या केल्या. परंतु, उर्मिला यांचा निश्चय दृढ होता. तेव्हापासून यांनी अन्नग्रहण केले नाही. त्या फक्त फलाहार घेत आहेत. उर्मिला यांच्या घरात राम दरबार असून त्या दररोज तिथे बसून राम नावाचा जप करतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like