Video : अभिनेत्रा सिध्दार्थ आणि परिणीति चोप्राच्या ‘जबरिया जोडी’चा ट्रेलर लॉन्च, जाणून घ्या ‘पकडवा विवाह’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीति चोप्रा यांचा चित्रपट ‘जबरिया जोड़ी’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूप मनोरंजक आहे. या ट्रेलरला काही तासातच ४५ लाख लोकांनी पाहिले आहे. चित्रपटाची कथा एका मुलाची आहे ज्याला एका मुलीवर प्रेम होते. नंतर तो मुलगा लग्न करण्यासाठी तिला टाळण्यास सुरुवात करतो. नंतर मुलगी त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी ‘पकड़वा विवाह’ करते.

चित्रपट भलेही थोडा मनोरंजक आहे पण हे बिहारच्या गंभीर समस्यावर प्रकाश टाकतो. बिहारमध्ये अशा घटना वारंवार होतात. जेव्हा तरुणांना किडनॅप करुन त्यांचे लग्न जबरदस्तीने एका मुलीसोबत लावले जात होते. याला ‘पकड़वा विवाह’ म्हणतात. हा विवाह अनेकदा मुलाच्या डोक्याला बंदूक लावून केले जाते. हे खूप भयानक आहे की, मुलाचे आणि मुलीचे लग्न जबरदस्तीने लावले जाते आणि लग्नासाठी नकार दिल्यावर त्यांना मारहाण केली जाते.

 

या प्रकारचे लग्न तेव्हा होते जेव्हा मुलाकडचे लोक जास्त हुंड्यांची मागणी करतात किंवा लग्न ठरल्यानंतर पुन्हा लग्न मोडतात. जास्तकरुन हुंड्याची मागणी होते तेव्हा ‘पकड़वा विवाह’ हा प्रकार घडतो. अशामध्ये मुलीकडचे लोक त्या गॅंगकडे संपर्क करतात जे ‘पकड़वा विवाह’ लावून देतात. ही गॅंग मुलाला किडनॅप करून त्याला मारहाण करुन त्याचे मुलीसोबत ‘पकड़वा विवाह’ लावून देतात.

‘पकड़वा विवाह’ करणाऱ्यांमध्ये एक मनोरंजक बाब ही आहे की, अनेकदा लोक प्रोफेशनल नसतात त्याऐवजी परिवाराचे लोक असेही असतात ज्यांनी हुंडा मागणीच्या समस्येचा सामना केला आहे. अनेकदा असे होते की, लोक जबरदस्तीने लग्न करतात पण ते हुंडा देऊ शकत नाही.

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

लाकडी कंगवा कमी करतो ‘केसाच्या’ तक्रारी

किचनमधील ‘या’ वस्तू करतील जखमांवर जालीम उपाय

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार