Jackfruit | फणस खाल्ल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका, होऊ शकतो मोठा तोटा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फणस (Jackfruit) हे एक चवदार फळ मानले जाते. फणसाची केवळ भाजीच नाही, तर त्याच्या आतील पिकलेल्या बियाही शिजल्यावर खाल्ल्या जातात. फणसाचे इतरही अनेक फायदे आहेत (Many Benefits Of Jackfruit). परंतु आपल्याला माहीत आहे का की फणस (Jackfruit) खाताना किंवा खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खायच्या? आयुर्वेदात फणसासोबत ५ गोष्टी खाण्यास मनाई आहे. असे मानले जाते की या पाच गोष्टी मागे-पुढे खाल्ल्याने किंवा फणसाबरोबर खाल्ल्याने शरीरात विष तयार होते.

 

फणस खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात अँटीऑक्सिडंट्स आणि लॅक्टिक अ‍ॅसिड (Antioxidants And Lactic Acid) भरपूर प्रमाणात असतं. हे फळ इम्युनिटी (Immunity) वाढवण्याचे काम करते. हे खाल्ल्याने अ‍ॅनिमिया आजारामध्येही खूप फायदा होतो, कारण यात भरपूर लोह असते. फणसात व्हिटॅमिन-बी (Vitamin-B) खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चा फणस चांगला असतो. त्यामुळे इन्सुलिनची पातळी (Insulin Level) सुधारते.

 

फणस खाल्ल्यानंतर दूध पिऊ नका (Don’t Drink Milk After Eating Jackfruit) –
(Jackfruit) खाल्ल्यानंतर कधीही दुधाचे सेवन करू नये. इतकंच नाही तर दूध प्यायल्यानंतरही फणसाचं सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकत. आपण असे केल्यास खाज सुटणे, एक्जिमा आणि सोरायसिसची समस्या (Itching, Eczema And Psoriasis Problem) उद्भवू शकते.

 

मध (Honey) –
जर तुम्ही फणसासह मधाचे सेवन केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. फणस खाल्ल्यानंतर मधाचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढू शकते. मधुमेहींसाठी तर हा प्रकार फारच घातक आहे.

 

पपई (Papaya) –
फणसाची भाजी किंवा पिकलेला फणस खाल्ल्यानंतर पपईचे सेवन कधीही करू नये.

पान (Betel) –
जगभरात असे अनेक लोक आहेत जे फणस खाल्ल्यानंतर पान खातात पण फणसाची भाजी खाल्यानंतर पानाच्या सेवनाने आरोग्याला हानी पोहचते.
फणस खाल्ल्यानंतर पान खाल्ल्याने शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

 

भेंडी (Lady Finger) –
जर तुम्ही फणस आणि भेंडीची भाजी खात असाल तर असं करू नका कारण या दोन्हींचं एकत्र सेवन केल्याने शरीरात त्वचेशी संबंधित समस्या,
पांढरे डाग (Skin Problems, White Spots) उद्भवू शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Jackfruit | never eat these 5 things after eating jackfruit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Home Remedies For Diarrhea | डायरियापासून लवकर होईल सुटका, ‘हे’ 10 सोपे घरगुती प्रभावी उपाय करा; जाणून घ्या काय खावे आणि काय खावू नये

 

How To Improve Eyesight | उन्हाळ्यात डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी ‘या’ 7 फूड्सचा फायदा; जाणून घ्या

 

Corporator Vasant More | पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे पक्षाच्या WhatsApp ग्रुपमधून लेफ्ट; मनसेतील अंतर्गत धुसफूस वाढतेय ?