Jackie Shroff | जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफने केली सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार; 58.53 लाख रुपयांच्या फसवणूकीचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन – Jackie Shroff | बॉलीवुडचा जॅकी दादा अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ हिने (Ayesha Shroff) सांताक्रूझ पोलीस ठाण्यात (Santa Cruz Police Station) फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या कंपनीच्या डायरेक्टर ऑफ ऑपरेशनच्या (Director of Operations) विरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे की, आयशा श्रॉफ यांचा असा दावा आहे की, त्यांची 58.53 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी अॅलन फर्नांडिस याच्याविरुद्ध सांताक्रूझ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या Indian Penal Code (IPC) कलम 408, 420, 465, 467, 468 आणि 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमएमए मट्रीक्स कंपनीमध्ये (MMA Matrix Company) आरोपी अॅलन फर्नांडिस (Alan Fernandes) याची 2018 साली डायरेक्टर ऑफ ऑपरेशन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीमध्ये येणाऱ्या लोकांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण (Martial Arts Training) देण्याकरीता 3 लाख रुपये महिन्याच्या सॅलरीवर नोकरीस ठेवण्यात आले होते. एमएमए मॅट्रीक्स जिम ही टायगर श्रॉफची (Tiger Shroff) असून तो चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याने त्याची आई आयेशा ही तेथील सर्व कामकाज पाहत होती.
अॅलन फर्नांडिस याने एमएमए मट्रीक्स कंपनीतर्फे भारतात आणि भारताबाहेर अशा एकूण 11 स्पर्धांचे आयोजन
करण्याच्या नावाखाली जास्तीचे पैसे घेतले आणि तसेच जीममधील मार्शल आर्टचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची
डिसेंबर 2018 ते जानेवारी 2023 पर्यंत जमा झालेली फी ची एकूण 58,53,591 रुपये रक्कम ही कंपनीच्या
बँक खात्यामध्ये न भरता ती स्वतःच्या आयसीआयसीआय बँकेतील (ICICI Bank) खात्यामध्ये ठेवली.
तसेच काही रक्कम रोख स्वरूपात घेऊन कंपनीचा विश्वासघात करून पैशांची फसवणुक केली असा आरोप फिर्यादींनी केला आहे.
Web Title : JSB Bank Ltd | Kishor Bhagwan Tarwade unopposed as Director of Jaibhavani Sahakari Bank Ltd
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- NCP Chief Sharad Pawar | राऊतांना धमकी देणारे दोघे ताब्यात, तर शरद पवारांना धमकी देणाऱ्यांवर FIR
- CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Bribery Case | डॉ. अनिल रामोड यांनी ‘या’ कारणासाठी घेतली 8 लाखाची लाच, जाणून घ्या प्रकरण
- Jnana Prabodhini Prashala | ‘प्रतिमा उत्कट रंग कथा 23’ चित्र प्रदर्शनात स्टील लाईफ प्रात्यक्षिक