‘लॉकडाऊन’मध्ये फॅमिलीपासून दूर फार्म हाऊसवर अडकला जॅकी श्रॉफ ! पत्नी आयशा श्रॉफ म्हणते…

पोलिसनामा ऑनलाइन –कोरोना व्हायरसमुळं देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशात अनेक कलाकार दुसऱ्या ठिकाणी अडकले आहेत. सलमान खान, मनोज वाजपेयी, दीपक डोबरियाल यांच्यानंतर आता अॅक्टर जॅक श्रॉफही आपल्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर अडकला आहे. जॅकीसोबत त्याच्या कुटुंबातील एकही व्यक्ती तिथे उपस्थित नाही.

फार्म हाऊसवर का गेला होता जॅकी श्रॉफ ?

एका मुलाखतीत बोलताना जॅकीची पत्नी आयशा श्रॉफ म्हणाली, “जॅकी खंडाळ्यातील फार्म हाऊसवर काही नवीन झाडे लावण्यासाठी आणि काही प्रीमान्सून काम उकरण्यासाठी गेला होता. यानंतर तो तिथेच अडकला. जॅकीसोबत त्याचा स्टाफही आहे. त्याच्याकडे ताजी हवा, स्पेस आणि स्वत: पिकवलेल्या भाज्या आहेत.”

आयशाला जेव्हा विचारण्यात आलं की, अशा महामारीत जॅकी फार्म हाऊसवर अडकला आहे तर तिला याबद्दल काही चिंता वाटत आहे का ? यावर बोलताना आयशा म्हणाली, “अजिबात नाही. कारण जॅकी पूर्णपणे ठिक आहे. आमचं कॉलवर आणि व्हिडीओ कॉलवर बोलणं होत असतं.”

जॅकीनं खंडाळ्यातील फार्म हाऊस 2012 मध्ये खरेदी केलं होतं. त्यानं पत्नीला 25 व्या लग्नच्या वाढदिवसानिमित्त फार्म हाऊस गिफ्ट म्हणून दिलं होतं. जॅकीला गार्डनिंगचा खूप छंद आहे. त्यामुळं तो नेहमीच या कामासाठी फार्म हाऊसवर जात असतो.