ब्रेकअपच्या 6 वर्षानंतर X बॉयफ्रेंडला भेटली जॅकलिन, काय शिजतंय डोक्यात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहेत. अलीकडेच तिने आपला 34 वा वाढदिवस श्रीलंकेत साजरा केला. आता जॅकलिन तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबतच्या नात्याबाबत चर्चेत आहे. जॅकलिनचा एक्स बॉयफ्रेंड दुसरा कोणी नसून साजिद खान आहे. 6 वर्षांपूर्वी साजिद आणि जॅकलिनचा ब्रेकअप झाला होता.

‘हाऊसफुल 2’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली. यानंतर या दोघांचा एका वर्षात ब्रेकअप झाला. ब्रेकअप झाल्यानंतरही जॅकलिन साजिदची बहीण फराह खानची चांगली मैत्रिण राहिली आहे. ब्रेकअप झाल्यावर ६ वर्षानंतर साजिद जॅकलिनला भेटायला आल्याची बातमी समोर आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, जॅकलिन फर्नांडिस आणि साजिद खान यांनी एकमेकांशी चॅट करुन बोलण्यास सुरवात केली आहे. नुकतीच जॅकलिन फर्नांडिसच्या आगामी वेब मालिका ‘मिसेस सीरियल किलर’च्या सेटलाही साजिद खानने भेट दिली. दोघांची येथे भेट झाली आणि साजिदने जॅकलिनला घरी देखील सोडले.

साजिद खान आणि जॅकलिन जुन्या गोष्टी विसरून नवीन नातं सुरू करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अंदाज लावला जात आहे. जॅकलिन ‘साहो’ चित्रपटाच्या एका गाण्यामध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे गाणे ‘बॅड बॉय’ प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात जॅकलिन प्रभाससोबत पडद्यावर दिसणार आहे.

जॅकलिनने दक्षिणच्या टीमबरोबर काम करण्याविषयी सांगितले की, “मी प्रथमच दक्षिण टीमबरोबर काम केले आणि ते किती वेगाने काम करतात हे पाहून मला आश्चर्य वाटले. ते खूपच प्रोफेशनल आहे. प्रभासने 100% साध्य करेपर्यंत माझ्याशी सेटवर रिहर्सल केली होती.”

आरोग्यविषयक वृत्त –