…म्हणून जैकलीन फर्नांडीसने व्हिडिओ शेअर करुन मागितली ‘या’ व्यक्तीची माफी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जैकलिन फर्नांडीसने आपल्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती विनोद करताना दिसली. या व्हिडिओमध्ये बीटाउनचे प्रसिद्ध डिजाइनर मिकी कॉन्ट्रेक्टर दिसत आहे. जे जैकलिनच्या विनोदावर हसत आहे. हा व्हिडिओ शेअर करुन जॅकलिनने माफी मागितली.

टिक-टॉक व्हिडिओमध्ये जॅकलिन ‘कपिल शर्मा’ चे प्रसिद्ध किरकाद बच्चा यादव यांचा एका विनोदावर बोलताना दिसून आली. मोठ्या अंदाजात ती लिप सिंक करत आहे. आणि हसत आहे. तिच्या सोबत मिकीही हसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना जैकलिनने माफी मागितली. तिने लिहले की, ‘सॉरी मिकी मी तुझ्यासोबत असे केले.’ यासोबत त्यांनी लाफिंग आणि किस इमोजीचा वापर केला.

या स्टेटसला वाचून असे वाटते की, जैकलिनने जबरदस्तीने मिकीला या टिक-टॉक व्हिडिओत सहभागी केले होते. कदाचित याच गोष्टीसाठी तिने माफी मागितली. खरे कारण जैकलिन आणि मिकिला माहित असेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like