Jacqueline Fernandez | महाठग चंद्रशेखरचे धक्कादायक खुलासे ! जॅकलीनला 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांची मांजर दिली भेट, तर नोराला…

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन –  Jacqueline Fernandez | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) प्रचंड चर्चेत येत आहे. या मागील कारण धक्कादायक आहे. जॅकलीनचं नाव ठग सुकेश चंद्रशेखरसोबत (Thug Sukesh Chandrashekhar) जोडलं जात आहे. सुकेश चंद्रशेखरवर 200 करोड खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामीनवर बाहेर आला. त्यामुळे जॅकलीन अशा व्यक्तीला डेट (Date) करत असल्याच्या चर्चांवर लोकांना विश्वास बसत नाही.

अशातच शनिवारी दिल्लीच्या पटियाला हाऊसमध्ये जमा करण्यात आलेल्या चार्जशीटमधील धक्कादायक खुलासे एनआयने केले आहेत. यामध्ये चंद्रशेखरने जॅकलीनला (Jacqueline Fernandez) 72 लाख रुपयांचा घोडा (Horse) आणि 9 लाखांची मांजर (Cat) भेट दिली असल्याचं समोर आलं आहे.

एवढंच नाही तर चंद्रशेखरने अभिनेत्री नोरा फतेहीला (nora fatehi) देखील एक आयफोन (iPhone) आणि बीएमडब्लू गाडी (BMW Car) भेट दिली आहे. ज्याची एकूण किंमत 1 कोटी (1 Crore) रुपये आहे. मात्र याबाबत विचारल्यानंतर नोराने मला विनाकारण फसवलं जात असून मी आरोपीला ओळखत देखील नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) सुकेश डेट करत असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असल्या तरी लोकांना त्यावर विश्वास नव्हता. यादरम्यान, जॅकलीनला ईडीचं (ED) समन्स देखील आलं होतं. ज्यानंतर तिची 7 तास चौकशी (Investigation) करण्यात आली होती. याबाबत तिच्या मॅनेजरने तिला फक्त पुराव्यासाठी बोलवण्यात आलं होतं, असं सांगितलं होतं. इतकं होऊन देखील लोकांना त्यांच्या डेटींगच्या गोष्टींवर विश्वास बसत नाही.

दरम्यान, जॅकलीनचा सुकेशसोबत एक रोमँटीक फोटो समोर आला होता.
ज्यामुळे लोक हैराण झाले आहेत. सुकेश चंद्रशेखरसोबत त्याच्या पत्नीवर देखील खंडणीचा गुन्हा आहे.
तसेच सुकेशच्या पत्नीचं नाव मारिया पाॅल (Maria Paul) असं आहे.
जामीननंतर जॅकलीन आणि सुकेश चार वेळा चेन्नईमध्ये भेटले असल्याचं समोर आलं आहे.
तसेच अनेक वेळा जॅकलीनला भेटण्यासाठी चंद्रशेखरने तिच्यासाठी प्रायव्हेट जेट (Private Jet) देखील आयोजित केलं होतं.

Web Title : Jacqueline Fernandez | chandrashekhar gave gifts worth crores to jacqueline fernandez and nora fatehi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ‘या’ सरकारी योजनेत दरमहिना जमा करा 210 रुपये;
पती-पत्नी दोघांना मिळेल 10,000 रू. पेन्शन, समजून घ्या गणित

OBC Reservation Maharashtra | ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका !
OBC आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे

Devendra Fadnavis | ‘काही संकुचित वृत्ती देशाला ‘त्या’ मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात’ (व्हिडिओ)

Shashi Tharoor | शिवसेनेच्या खा. प्रियंका चतुर्वेदींनंतर काँग्रेस खासदार शशी थरुर यांचाही राजीनामा; सोडला TV शो