Jacqueline Fernandez | ईडीचा धक्कादायक गौप्यस्फोट, जॅकलीन फर्नांडिस देश सोडून पळून जाणार होती; जाणून घ्या आणखी खुलासे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हस्तक्षेप करू शकते, त्यामुळे तिला जामीन देऊ नये. ती देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होती, असा गौप्यस्फोट ईडीने (ED) आज कोर्टात केला. जॅकलीनला (Jacqueline Fernandez) आज कोर्टात हजर केले असता तिच्या अंतरीम जामिनात 10 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. ईडीने पटियाला हाऊस कोर्टात (Patiala House Court) हा युक्तिवाद करताना जॅकलीनच्या जामिनाला विरोध केला आहे.

 

जॅकलीनच्या (Jacqueline Fernandez) जामीनाला विरोध करताना ईडीने आज कोर्टात सांगितले की, जॅकलीन चौकशी दरम्यान पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होती. तिने मोबाईलमधील डेटा डिलीट केला होता. तसेच चौकशी सुरू असतानाच ती देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होती. एलओसी (LOC) जारी करण्यात आल्याने त्यात ती यशस्वी होऊ शकली नाही. जॅकलीनची जेव्हा जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा तेव्हा तिने तपास कामात सहकार्य केले नाही. चौकशी वेळी जॅकलीनची वागणूक बरोबर नव्हती. ती पुरावे नष्ट करू शकते. साक्षीदारांना त्रास देऊ शकते, असे म्हणत ईडीने कोर्टात जॅकलीनच्या जामिनीला विरोध केला.

 

दरम्यान, या प्रकरणातील महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने त्याच्या वकिलाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलीनचा काहीच संबंध नाही. आमच्यातील नात्यामुळेच मी तिला पैसे आणि गिफ्ट दिले. रॅनबेक्सीच्या आधीच्या मालकाची बाजू घेण्यासाठी मला 200 कोटी रुपये मिळाले होते. इंडोनेशियात माझी कोळशाची खाण आहे. हॉटेल आणि न्यूज चॅनलचे स्टेक आहेत. ते मी विकले आहेत.

आता जॅकलीन प्रकरणावर आता 10 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
आजच्या सुनावणीत वकील प्रशांत पाटील (Advocate Prashant Patil) यांनी जॅकलीनची बाजू मांडली.
कोर्टाने ईडीला सर्व पक्षकारांना चार्जशीट आणि प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे देण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title :- Jacqueline Fernandez | ed says jacqueline fernandez tried to flee india tamper evidence entertainment news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rohit Patil | कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची मते फुटल्यावर रोहित पाटलांचा संजय पाटलांना प्रश्न

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे उद्यापासून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार

Aditya Thackeray | तुमच्या दोघांपैकी जे कोणी खरे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी माझ्या मागणीची दखल घ्या – आदित्य ठाकरे