जॅकलीन फर्नांडिसची अजब पोज ! ‘असं’ केलं Hot फोटोशुट

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) अनेकदा आपले बिकीनी फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. आपल्या बिकीनी फोटोंमुळे ती खूपदा चर्चेचा हिस्सा बनली आहे. पुन्हा एकदा जॅकलीननं काही फोटो शेअर केले आहेत जे सोशलवर चर्चेत आहेत.

जॅकलीननं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती सुपरहॉट अवतारात दिसत आहे. समोर आलेल्या फोटोत जॅकलीन काही डान्स पोज करताना दिसत आहे. जॅकलीनचा लुकही खूप बोल्ड आहे. यातील पायाच्या अंगठ्यावर बॅलन्स करतानाचा तिचा एक फोटो खूप अटेंशन घेताना दिसत आहे.

जॅकलीनचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

जॅकलीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती जॉन अब्राहमच्या अटॅक या सिनेमात दिसणार आहे. सध्या तिच्याकडं भूत पोलीस, किक 2 , सर्कस आणि बच्चन पांडे हे सिनेमे देखील आहेत. याआधी ती मिसेज सिलियर किलर या वेब सीरीजमध्ये दिसली आहे. 2009 साली आलेल्या अलादीन या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं.