Jacqueline Fernandez | ‘ईडीला उत्तर’न देता जॅकलीन पोहोचली ‘रामसेतू’च्या शुटिंगसाठी

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  दिल्लीच्या तिहार जेल मध्ये बंद असलेला सुकेश चंद्रशेखर द्वारे 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स पाठवले. नोराला समन्स जारी करून या प्रकरणी चौकशीत सहभागी होण्यास सांगण्यात आले होते, यानंतर नोरा आपला जबाब नोंदवण्यासाठी ईडी कार्यालयात पोहचली असून, सुकेश वर केवळ नोरा फतेहीच नव्हे, तर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) फसवल्याचा सुद्धा आरोप आहे. नोरा फतेहीसह ईडीने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) सुद्धा पुन्हा समन्स पाठवले आहे, आज तिसऱ्या वेळी समन्स पाठवण्यात आला होता परंतु जॅकलिन उपस्थित राहिलीच नाही.

अभिनेत्री जैकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) सोशल मीडिया वरती एक्टिविटी वरून कायम चर्चे मध्ये असते.
खाजगी आयुष्याशी आणि चित्रपटाशी निगडित सर्व गोष्टी जॅकलिन सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.
जॅकलीनने आगामी चित्रपट ‘रामसेतू’ चित्रपटाचे शूटिंग आज पासून चालू केले आहे.
त्या संबंधित जॅकलीनने इन्स्ट्राग्राम वरती फोटोज शेयर केले आहेत.

पोस्ट केलेल्या फोटो मध्ये जॅकलीन स्पष्ट पने दिसून येत नाही पण अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या सोबत निसर्गाचे सौंदर्य निहाळताना दिसून येत आहे.
फोटो ऐका साईडने क्लिक केला आहे त्यामुळे अक्षय आणि जॅकलीन दिसून येत नाही.
फोटोमध्ये पाहिलं तर सगळी कडे हिरवळच दिसून येत आहे.
फोटो मध्ये अक्षय कुमारला टॅग करून खाली लिहीत – “माझ्या आवडीच्या उटी मधील ‘रामसेतू’ च्या सेटवर माघारी येऊन मला खूप आनंद होत आहे ! प्रकृती स्वतःमध्येच खूप श्रेष्ठ आहे “.

 

उटी मध्ये शूटिंग चालू होण्याआधी श्रीलंका येथे शूटिंग होणार असल्याचे समोर आले होते.
त्यामध्ये असं म्हणण्यात आलं होत की शुटींग खुल्या मैदानामध्ये घेण्यात येणार होते.
त्यामुळे निर्माता श्रीलंका जाण्याचा विचार करत होते.
चित्रपटाचे शूटिंग सुरु करण्या आधी प्रभू श्रीराम यांचे जन्म स्थान “अयोध्या” मध्ये पूजा करण्यात आली होती.

 

Web Title : Jacqueline Fernandez | jacqueline fernandez resumes shooting for ram setu shares picture from sets

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आरक्षणाबाबत मोठं विधान, म्हणाले…

Aadhaar Card | जर तुमच्याकडे असेल Aadhaar तर एका क्लिकवर मिळेल कर्ज, जाणून घ्या कसा आणि कुठे करायचा अर्ज?

Girish Mahajan | काय सांगता ! होय, माजी मंत्री गिरीश महाजनांनी चक्क सिनेमा निर्मात्याकडे केली ‘ही’ मागणी; म्हणाले – ‘अजितदादा, जयंत पाटील….’