Jacqueline Fernandez | सुकेशविरोधात जॅकलिन फर्नांडिसने केला मोठा खुलासा; म्हणाली ‘त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त…’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. तिहार तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. जॅकलिन फर्नांडिस हिच्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिला अत्यंत महागडे गिफ्ट देखील दिल्याचे सांगण्यात येतेय. त्यामुळे जॅकलिनची (Jacqueline Fernandez) ‘ईडी’कडून अनेकदा चौकशी झाली. या प्रकरणामुळे जॅकलिनलला ‘द घोस्ट’ नावाचा चित्रपटही गमवावा लागला. त्यामुळे जॅकलिनचा पासपोर्टही जप्त करण्यात आलाय.

 

ईडीने काही दिवसांपूर्वी कोर्टामध्ये सांगितले होते की, जॅकलिन फर्नांडिस ही एक परदेशी नागरिक आहे. जॅकलिन फर्नांडिस हिच्याबाबत ईडीने असेही म्हटले होते की, परदेशात जॅकलिन आपले करिअर तयार करू शकते. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिची महत्वाची भूमिका आहे. यामुळे तिला परदेशात जाण्याची परवानगी देण्यात येऊ नये.जॅकलीनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बहरीनमधील तिच्या आजारी आईला भेटण्यासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, न्यायालयाने तिला परदेशात जाण्याची परवानगी देण्यास तयार नसल्याने तिने ते मागे घेतले. अलीकडेच जॅकलीनने गँगस्टर सुकेश चंद्रशेखर आणि त्याची सहकारी पिंकी ईराणी विरोधात पटियाला कोर्टात जबाब नोंदवला आहे.

यावेळी अभिनेत्री म्हणाली की, सुकेशने माझ्या भावनांशी खेळून माझं करिअर आणि खाजगी आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त केलं. जॅकलिन पुढे अशी म्हणाली कि, तिला सुकेशचं खरं नावसुद्धा माहीत नव्हतं. सुकेशने पिंकी ईराणीमार्फत जॅकलिनशी संपर्क साधला होता. सुकेश हा गृहमंत्रालयाशी संबंधित असून तो सरकारसाठी काम करतो, अशी खोटी ओळख पिंकीने जॅकलिनला (Jacqueline Fernandez) करून दिली होती. इतकंच नव्हे तर “तो सन टीव्हीचा मालक आहे आणि जयललिता यांच्या कुटुंबीयांशी त्याचे जवळचे संबंध आहेत. तुझा तो खूप मोठा चाहता आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील बरेच प्रोजेक्ट्स त्याने तुझ्यासाठी आणले आहेत”, असं सांगून जॅकलिनची फसवणूक केली होती.

 

दिवसातून किमान 3 ते 4 वेळा आम्ही फोन आणि व्हिडिओ कॉलवर बोलायचो.
पण तो जेलमधून मला फोन करायचा याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती.”
तसेच सुकेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी कळल्यानंतरही पिंकीने तिला सांगितले नाही, असेही जॅकलिन म्हणाली.
न्यायालयाने 16 जानेवारी रोजी जॅकलिनने व्यावसायिक कामासाठी दुबईला जाण्याची परवानगी मागणाऱ्या अर्जावर अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली होती.
त्यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जानेवारी घेण्यात येणार आहे.

 

Web Title :- Jacqueline Fernandez | jacqueline fernandez tells delhi court sukesh chandrashekhar played with her emotions

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prisoners Release | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 कैद्यांना विशेष माफी, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Michael Bracewell | ब्रेसवेलने केली धोनीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा खेळाडू

Maharashtra Politics | बहुमत राष्ट्रवादीला; सूत्रे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती…