Jacqueline Fernandez | जॅकलिनच्या जुन्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले “स्वतः किती वेळा……”

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत होती. आता पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणाने जॅकलिन चर्चेत आहे. नुकताच जॅकलिनचा (Jacqueline Fernandez) एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. ते पाहून नेटकऱ्यांकडून तिला ट्रोल केले जात आहे. हा व्हिडिओ जेव्हा ती मिस युनिव्हर्स श्रीलंका स्पर्धा जिंकली होती, त्यावेळेसचा असल्याचे समोर आले आहे.

 

या स्पर्धेदरम्यान जॅकलिनला विचारण्यात आले होते की, “सौंदर्य प्रक्रियेबद्दल तुझे मत काय”? यावर बोलताना जॅकलिन म्हणाली होती की, “कॉस्मेटिक सर्जरी ही एक अयोग्य पद्धत आहे. आपले सौंदर्य हे आपल्याला मिळालेले वरदान असते, त्याच्यासोबत कोणतीही छेडछाड करण्याचा अधिकार आपल्याला नाही. स्त्रियांच्या नैसर्गिक सौंदर्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे. तसेच जर कॉस्मेटिक सर्जरीला चालना दिली तर ते कोणालाही परवडणारे नाही”. या व्हिडिओमध्ये जॅकलिन इतकी वेगळी दिसते की ती ओळखूदेखील येत नसल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केले आहे, तर एका नेटकऱ्यानी म्हटले की” तू आतापर्यंत किती वेळा सर्जरी केलीस?” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, “स्वतः तू कॉस्मेटिक सर्जरी केल्याची चर्चा आहे आणि कोणाला सांगतेस की सर्जरी करणे चुकीचे आहे म्हणून”. जॅकलीन (Jacqueline Fernandez) ने 2006 मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंका हा किताब जिंकल्यानंतर 2009 मध्ये तिने ‘अलादीन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले, तर नुकतीच ती ‘रामसेतू’ या चित्रपटातदेखील दिसली होती. आता ती रणवीर सिंगच्या आगामी ‘सर्कस’ चित्रपटातदेखील दिसणार आहे.

 

Web Title :- Jacqueline Fernandez | jacqueline fernandez viral video on reaction for cosmetic surgery netizens trolled her

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | धक्कादायक! बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्यातच घेतले पेटवून; पिंपरी चिंचवडमधील घटना

Sanjay Raut | ‘काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले, गुजरात भाजपकडे’ – संजय राऊत

Congress Leader Nana Patole | “भाजप सर्वकाही उद्योगपतींसाठी करत आहे”; धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला, नाना पटोले यांची टीका