Video Viral : जॅकलीनचा बेली डान्स चाहत्यांना करतोय घायाळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने जॅकलीन फर्नांडिस नेहमीच चाहत्यांना भुरळ घालत असते. तिने जेव्हापासून बाॅलीवूडमध्ये पदार्पण केले आहे तेव्हापासून ती नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली आहे. जॅकलीन ही सोशलवरही ओक्टीव्ह असते. अनेकदा ती आपल्या आगामी चित्रपटांची माहिती सोशल मीडियावरच देत असते. तिचे फोटो असो किंवा डान्सचे व्हिडीओ असो ती नेहमीच सोशलवर शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या एका डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिचा हा व्हिडओ चांगलाच व्हायरल झाला आहे. चाहत्यांची मोठ्या प्रमाणात या व्हिडीआेला दाद मिळत आहे.

जॅकलीनने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅकलीन बेली डान्स करताना दिसत आहे. ‘मर्डर 2’ चित्रपटातील ‘आ जरा’ या गाण्यावर जॅकलीन थिरकत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत सादिका खानदेखील दिसून येत आहे. ही तर सुरुवात आहे. दबंग रिलोडेड दुबई. रिहर्सल विथ माय सादिका खान असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.

जॅकलीनच्या बेली डान्सला चाहत्यांची चांगलीच दाद मिळत आहे. तिच्या डान्सचा हा व्हिडीओ 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. सध्या जॅकलीन तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. ‘ड्राइव्ह’असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये जॅकलीनसोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट २८ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे तरुण मंसुखानी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

ह्याही बातम्या वाचा –

गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार गजाआड

सोशल मीडियावरील आचारसंहितेचा पुढाऱ्यांनी घेतला धसका

सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठरणार लोकसभा प्रचाराची दिशा

#Loksabha Election 2019 : काँग्रेसकडून राज्यातील ५ अधिकृत उमेदवारांची घोषणा  कोण आहेत ते ५ उमेदवार वाचा सविस्तर

पुणे-मुंबई प्रवाशांसाठी खुशखबर, डेक्कन क्वीनच्या प्रवासाचा वेळ कमी होणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us