इंदापूर तालुक्यातील जाधववाडी ग्रामपंचायतीला मीळणार बिनविरोधचा पहिला ‘मान’

इंदापूर – इंदापूर तालुक्यात २०२०-२५ या कालावधीसाठी निवडणुका जाहिर झालेल्या ६० ग्रामपंचायतीपैकी जाधववाडी ग्रामपंचायतीच्या (Jadhavwadi Gram Panchayat)
सात जागांसाठी मुदत अखेरच्या दिवसापर्यंत सातच उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन छानणीत सातही अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील (Indapur Taluka) जाधववाडी ग्रामपंचायत (Jadhavwadi Gram Panchayat) बीनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असुन अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत ४ जानेवारी असल्याने जाधववाडी ग्रामपंचायत बीनविरोध घोषीत करण्याची फक्त औपचारिकता बाकी असल्याची माहीती इंदापूर तालुका ग्रामपंचायत निवडणुक (Indapur Taluka Gram Panchayat Election)  नियंत्रण अधिकारी तथा तहसिलदार सोनाली मेटकरी (Tehsildar Sonali Metkari) यांनी दीली आहे.

इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीच्या ६१० जागांसाठी निवडणुक कार्यालयात ३०डिसेंबर अखेर २ हजार २९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन ३१ डिसेंबर रोजी सर्व अर्जांची छानणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ४५ अर्ज अवैध ठरले आहेत.तर दोन हजार २४६ उमेदवारी अर्ज निवडणुक रिंगणात राहीले आहेत. निमगाव केतकी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी सर्वात जास्त विक्रमी ९२ अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननीत त्यापैकी प्रभाग क्रमांक ४ मधील एक अर्ज बाद झाला असुन ९१ अर्ज वैध ठरले आहेत.पोंधवडी ग्रामपंचायतीच्या ०९ जागांसाठी ५६ अर्ज दाखल झाले होते.त्यापैकी सर्वात जास्त ०६ अर्ज अवैध ठरले असुन. अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ जानेवारी असल्याने त्याच दिवशी दुपारी तीन वाजता इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

यामध्ये चांडगाव ग्रामपंचायत १८अर्ज, लोणी देवकर ४०,बळपूडी १८,भावडी १६,पळसदेव ६८,अकोले ४७,तक्रारवाडी५२,शेटफळगढे ४७,पिंपळे २७,निरगुडे ३३,भिगवण ७१,पोंधवडी ५०,कुंभारगाव २८,भादलवाडी २८,निरवांगी ३४,दगडवाडी २७,पिटकेश्वर २०,घोरपडवाडी २०,सराफवाडी ३४,निमगाव केतकी ९१,कचरवाडी (नि.के.)१८,व्याहळी २०,कौठळी २९,वरकुटे खुर्द ४१,हगारेवाडी २८,कडबनवाडी २५,गोतोंडी ४२,निमसाखर ४४,अंथुर्णे ६३,भरणेवाडी ३८,लासुर्णे ६९,वालचंदनगर ६७,कळंब ५९, रूई ५०,कळस ७५,शहा ३३,सरडेवाडी ३०,तरंगवाडी ४४,गलांडवाडी नं.१ ३५, बाभुळगाव ३३,गोंदी २६,चाकाटी २६, भांडगाव २६, नरसिंहपूर २३,टण्णु ३१, गलांडवाडी नं.२. २४, पिंपरी बु.३२,गुरवी ३१, भोडणी ५०, कचरवाडी(बा)१६, पिठेवाडी ३२,निंबोडी ३६,तावशी ४१, सपकळवाडी २५,जाचकवस्ती २०, सणसर ८७,चिखली १८,काटी ४२,जाधववाडी ०७, रेडा ४० अर्ज असे एकुण २२४६ अर्ज वैध ठरले आहेत.

तालुक्यातील शेटफळगढे ग्रामपंचायत १ अर्ज छाननित अवैध ठरला आहे.तर पिंपळे २, निरगूडे. ४, भिगवण १, पोंधवडी.६, कुंभारगाव १,सराफवाडी १, निमगाव केतकी. १, अंथुर्णे.१, भरणेवाडी. ३, लासुर्णे १, कळंब.१, रूई.२, कळस. १, शहा. १, सरडेवाडी. १, तरंगवाडी. ३, गोंदी. ४, चाकाटी. २, भांडगाव.१, नरसिंहपूर १, गलांडवाडी नं.२. २, निंबोडी. २, तावशी.१, सणसर.१, असे एकुण २५ ग्रामपंचायतीमधुन ४५ दाखल अर्ज अवैध ठरले आहेत.तर बीनविरोध होणार्‍या ग्रामपंचायतीला शासनाकडुन भरीव निधीचे बक्षीस असल्याने जाधववाडी ग्रामपंचायत बक्षीसास पात्र ठरणार असुन तालुक्यातील आणखी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी स्थानिक गावपुढारी, पॅनलप्रमुख व वरिष्ठ नेत्यांचा कस लागणार असुन ४ जानेवारु २०२१ रोजु दुपारी ३ वाजता याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.