अमित शाहांची आंध्रप्रदेशचे CM जगनमोहन रेड्डी यांना मोठी ‘ऑफर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सभापती आणि उपसभापती कोण यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही, परंतू एनडीएतील दुसरा मोठा पक्ष म्हणून आपल्याला उपसभापती पद हवे अशी मागणी शिवसेना करत आहे. पण असे असताना दुसरीकडे मात्र अमित शाह यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना आज मोठी ऑफर दिल्याचे कळते आहे. आज जगनमोहन रेड्डी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची गृह मंत्रालयात भेट झाली. मिळालेल्या माहितीनुसार वायएसआर काँग्रेसच्या जगन मोहन रेड्डींना लोकसभेतील उपसभापती पद दिले जाऊ शकते.

तरच भाजला वायएसआरचा पाठिंबा –
वायएसआरच्या सूत्रांनुसार सांगण्यात आले की त्यांना उपसभापती पदाची ऑफर देण्यात आली आहे. परंतू असे असले तरी त्यांच्या समोर भाजपला पाठिंबा देण्याची अट ठेवण्यात आली आहे. यानंतर वायएसआरने राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली. वायएसआर कडून सांगण्यात आले आहे की राज्याला विशेष दर्जा नाही तर भाजपला पाठिंबा नाही. आज रेड्डींनी अमित शाहांची भेट घेेतल्यानंतर अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपने रेड्डींना उपसभापती पदाची ऑफर दिली आहे.

या नेत्यांना उपसभापती पदाची ऑफर –
भाजपने लोकसभा उपसभापती पदासाठी बीजेडीचे नवीन पटनायक आणि वायएसआरचे जगन मोहन रेड्डी दोघांना देखील ऑफर दिली आहे, सांगण्यात येत आहे की त्यासाठी त्यांच्यापुढे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. अटी मान्य केल्यास यापैकी एका पक्षाच्या नेत्यास उपसभापती पद मिळू शकते.
आता भाजपने या दोन पक्षांना उपसभापती पदाची ऑफर दिल्याने शिवसेना काय करते हे पाहणे योग्य ठरेल. यानंतर शिवसेनेला उपसभापती पद मिळणार का की भाजप सेनेला डच्चू देणार हे पाहणे आवश्यक ठरेल.

आरोग्य विषयक वृत्त-
महिलांनो, नॅचरल ग्लो हवाय? मग अवश्य करा ‘हे’ उपाय
सौंदर्य वृद्धीसाठी प्राचीन काळापासून केले जाता ‘हे’ आयुर्वेदिक उपाय
पावसाळ्यात आरोग्याची घ्या अशी काळजी

You might also like