युपीएला मोठा ‘झटका’ ! ‘या’ नेत्याने उचलला नाही शरद पवारांचा फोन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मतदान पार परडल्यानंतर आता निकालाची वाट पाहणाऱ्या राजकीय पक्षांकडून सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. त्यातच कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली य़ुपीएसोबत तिसऱ्या आघाडीसाठी सर्व विरोधकांनी प्रयत्नांना सुरुवात केली आहे. मात्र यावेळी सर्व पक्षांना सोबत घेण्याची धडपड कॉंग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांकडून सुरु आहेत. परंतु युपीएतील महत्वाचा समजला जाणारा पक्ष आणि त्याचे नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन घेण्याचे मंगळवारी एका नेत्याने टाळले. या नेत्याने निकालाआधी आपल्यासमोरील सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.

निकालानंतर संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सामील होण्यासाठी राष्ट्रीय पक्षांसोबतच प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याची रणनीती शरद पवार आणि इतर नेत्यांकडून आखली जात आहे. मंगळवारी शरद पवारांनी आंध्र प्रदेशातील महत्त्वाचा पक्ष समजल्या जाणाऱ्या वायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांना फोन केला. मात्र त्यांनी फोन घेतलाच नाही. संयुक्त पुरोगामी आघाडीत सहभागी होण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पवारांनी रेड्डी यांना फोन केला होता. परंतु त्यांनी फोन घेतलाच नाही.

त्रिशंकू झाल्यास रेड्डींचे महत्व वाढणार

जगनमोहन रेड्डी यांनी आपण कोणत्याही आघाडीत जाण्यास उत्सुक नाही असे निकालाआधी जाहिर केले. त्यानंतर EXIT POLL मध्ये वायएसआर कॉंग्रेसला टीडीपी पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी ही भूमिका जाहिर केली. दरम्यान लोकसभा निवडणूकीचा निकाल त्रिशंकू लागला तर रेड्डी यांचे महत्व वाढू शकते हे त्यांनी वेळीच ओळखले आहे. त्यामुळेच त्यांनी शरद पवारांना टाळले की काय असा सवाल आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत रेड्डी कोणाशीही बोलणार नाहीत असे सुत्रांनी सांगितले.

युपीएला दोन्ही विरोधक हवेत सोबत ?

तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू आणि वायएसआर कॉंग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी हे दोघे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. मात्र कॉंग्रेसला चंद्रबाबू नायडू आपल्या सोबत असावेत असे वाटते. अशातच युपीएच्या वतीने गेलेला फोन गेला याचा अर्थ त्यांना चंद्रबाबू नायडूंचे विरोधकही सोबत हवे आहेत. परंतु हे दोन्ही विरोधक सोबत येतील का ?