‘या’ सरकारची नवी ‘स्कीम’, विद्यार्थ्यांच्या आईच्या बँक खात्यात जमा होणार 15000 रूपये

हैदराबाद : वृत्तसंस्था – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ‘अम्मा वोडी’ योजना जाहीर केली आहे. मुलांच्या शिक्षणात मदत व्हावी, या हेतूनं रेड्डी सरकारनं ही योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलांना शाळेत पाठवणाऱ्या प्रत्येक आईच्या बँक खात्यात दर वर्षाला १५ हजार रुपये जमा होतील. जोपर्यंत मुलांचं शालेय शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे गरीब महिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे. लॅपटॉपचं बटन दाबून रेड्डींनी या योजनेचा शुभारंभ केला. ‘अम्मा वोडी’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ राज्यातील ८२ लाख मुलांना होईल. या योजनेच्या अंतर्गत ४३ लाख मातांच्या खात्यात दर वर्षी १५ हजार रुपये जमा करण्यात येतील.

या योजनेअंतर्गत महिला ज्यांचं मुल सध्या शाळेत (पहिली ते बारावी) शिकत आहेत, मग ती खासगी शाळा असो किंवा सरकारी, अनुदानित असो किंवा विनाअनुदानित ते या योजनेसाठी पात्र आहेत. तिरुपतीपासून ७० किलोमीटरवर असलेल्या चित्तूरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना रेड्डींनी या योजनेची माहिती दिली. ‘राज्यातील ८२ लाख मुलांना अम्मा वोडी योजनेचा फायदा होईल. सरकार जवळपास ४३ लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार असून यावर ६,३१८ कोटी रुपये खर्च होतील,’ असं रेड्डींनी सांगितलं. योजनेसाठी राज्य सरकारला २०१९-२० आर्थिक वर्षात ६४५५ कोटींचा खर्च येत असून त्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मुलांच्या शिक्षणाआड येऊ नये असा विचार त्यावेळी माझ्या मनात आला. त्यातून अम्मा वोडी योजनेची कल्पना सुचली,’ असं रेड्डी म्हणाले. शाळा, महाविद्यालयात अनुत्तीर्ण झालेल्या मुलांना, सरकारी कर्मचाऱ्यांना आणि आयकर भरणाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या वाढावी हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. तस तर मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाव यासाठीही प्रयत्न आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/