अलिशान बंगला ‘उध्दवस्त’ केल्यानंतर आता CM जगन मोहन रेड्डींची चंद्रबाबू नायडूंच्या राहत्या घरावरही ‘वक्रदृष्टी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारी निवासस्थानावर कारवाई केल्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी चंद्राबाबूंच्या घरावर कारवाई करणार आहेत. प्रजा वेदिका इमारतीवर कारवाई केल्यानंतर आता १७ इमारतींना राज्य सरकारने नोटीस पाठवले आहे. या सर्व इमारतींना अनधिकृत बांधकाम आणि काम करताना परवानगी न घेतल्याचा आरोप करत नोटीसला बजावण्यात आल्या आहेत.

कृष्णा नदीकाठी घरांची विनापरवाना निर्माण करण्यात आले आहे. यामुळे नदी संवर्धन कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे ह्या नोटीस देण्यात आल्या असल्याचा सांगण्यात येत आहे. नोटिसा बजावण्यात आलेल्या १७ इमारतींमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या राहत्या घराचा देखील समावेश आहे. त्यामुळे चंद्राबाबूंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी पहिली बैठक घेतल्यानंतर काही तासांतच प्रजा वेदिका या इमारतीवर बुलडोझर फिरवला होता. त्यामुळे यावेळी देखील या इमारतींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सुरक्षा केली कमी

या अगोदर देखील जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात केली होती. विमानतळावर त्यांना सामान्य नागरिकांप्रमाणे बस प्रवास करावा लागला होता. झेड दर्जाची सुरक्षा त्यांना होती. रेड्डी यांच्या सरकारने ती कमी करून वाय दर्जाची केली. त्याचबरोबर त्यांचा मुलगा नारा लोकेश याच्या देखील सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात अली आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी याच्या मोठे बहुमत मिळवले असून तेलगू देसम पार्टीचा या निवडणुकीत सुपडासाफ झाला होता. त्यांचे फक्त २३ आमदार निवडून आले असून चंद्राबाबू नायडू हे विरोधी पक्षनेते आहेत.

https://twitter.com/ANI/status/1144469502676983815

मराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’

युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही : धनंजय मुंडें

आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जायची भाषा करत असाल तर… : नितेश राणे

भावाच्या खुनप्रकरणी शिक्षा झालेल्यांकडून दलित तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण