‘या’ राज्य सरकारचं शेतकऱ्यांना ‘गिफ्ट’ ; दरवर्षाला मिळणार ‘एवढी’ रक्कम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झाली असताना आंध्रप्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठया योजनेची घोषणा केली आहे. आंध्रप्रदेशातील सरकार राज्यात शेतकऱ्यांसाठी १५ ऑक्टोबर पासून एक योजना राबवणार आहेत ज्यात शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी तब्बल १२ हजार ५०० रुपये दिले जाणार आहे. रायतू भरोसा असे या योजनेचे नाव असून शेतकऱ्यांना या योजनेने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रायतू भरोसा या योजनेचे आंध्रप्रदेशातून कौतूक करण्यात येत आहे.

मात्र या योजनेच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी याआधीच्या टीडीपी सरकारची अन्नदाता सुखीभव ही योजना रद्द केली आहे. आंध्रप्रदेशातील तत्कालीन सरकारने निवडणूकीच्या आधी फेब्रुवारी २०१९ ला ही योजना आणली होती. या योजनेअंतर्गत तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांना १० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

जगनमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेशात लागू केलेल्या या योजनेनंतर इतर राज्यातील शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती असलेल्या राज्यांनी अशा प्रकारची योजना राबवण्याची मागणी देखील होऊ शकते आणि अशी योजना हतबल शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरु शकते.

जगनमोहन रेड्डी सत्तेत आल्यापासून मोठमोठे निर्णन घेत आहेत, त्यांनी या आधी अशाच प्रकारची योजने अशा कार्याकर्ते, वृध्द आणि युवकांसाठी देखील आणली आहे. त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आंध्रप्रदेशातील युवकांचा त्यांना पाठींबा वाढताना दिसत आहे.

अशा कार्यकर्त्यांना वेतनात वाढ
मेडीकल आणि आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अशा कार्यकर्त्यांना तीन टक्क्याने आधिक वेतन वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आशा कार्यकर्त्यांना आता ३ हजारावरुन १० हजार वेतन मिळणार आहे.