इंटरनेटवर व्हायरल होतोय जगदीपचा शेवटचा VIDEO, पाहून भावनिक व्हाल तुम्ही

नवी दिल्ली : फिल्म ’शोले’मध्ये सूरमा भोपाळीची भूमिका साकारणारे प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप यांचे बुधवारी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांचे खरे नाव सैय्यद इश्तियाक अहमद जाफरी होते. आपल्या भूमिकेने लोकांना प्रभावित करणार्‍या जगदीप यांना लोकांनी रियल नावाने नव्हे, तर रील नावाने शेवटपर्यंत ओळखले. त्यांच्या कुटुंबात मुलगा जावेद जाफरी आणि नावेद जाफरी आहेत. जावेद अभिनेता आणि डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे.

 

 

 

जगदीप यांच्या निधनानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर खुप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यास लोक जगदीप यांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचे म्हणत आहेत. हा व्हिडिओ जावेद जाफरी यांनी 2018 मध्ये आपल्या वडीलांच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर शेयर केला होता. या व्हिडिओमध्ये जगदीप आपल्या फॅन्सला मेसेज देताना म्हणत आहेत की, तुम्ही मला विश केले. सर्वांचे आभार. ट्विटरवर केले, फेसबुक वर, मी पाहिले ऐकले. खुप खुप धन्यवाद. ते पुढे म्हणताता…या तो दीवाना हंसे या वो जिसे तौफीक दे, वर्ना इस दुनिया में आकर मुस्कुराता कौन है. मैं मुस्कुराहट हूं. जगदीप हूं. आओ हंसते-हंसते और जाओ हंसते-हंसते.’

तर, हा व्हिडिओ शेयर करत जावेदने म्हटले होते की, माझे आदरणीय वडील सोशल मीडियावर नाहीत, त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व लाडक्या फॅन्ससाठी मेसेज पाठवला आहे, ज्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगदीप यांच्या निधनाने बॉलीवुडला मोठा धक्का बसला आहे. 2020 बॉलीवुडसाठी खुपच खराब ठरले आहे. या वर्षी इरफान खान, ऋषि कपूर, वाजिद खान, सुशांत सिंह राजपूत आणि जगदीप यांच्यासह अनेक मोठया कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. 29 मार्च 1939 मध्ये अमृतसरमध्ये जन्मलेले सैयद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ जगदीप यांनी सुमारे 400 चित्रपटांमध्ये काम केले, 1975 मध्ये आलेला रमेश सिप्पी यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ’शोले’ने त्यांना विशेष ओळख दिली.