भाजप पुणे शहराध्यक्षपदी जगदीश मुळीक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली. भाजपच्या संघटन पर्व कार्यक्रमात निवड जाहीर झाली.

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मावळत्या शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, महापौर मुरली मोहोळ, माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी महापालिकादृष्टीने वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघातील मुळीक यांची निवड केली असून या मतदारसंघात भाजपचे मतदार वाढल्याने पक्षाने येथे लक्ष केंद्रीत केले असे मानले जाते. तसेच भाजपने पुण्यातील दुसऱ्या फळीला पुढे आणण्याचे ठरविले आहे, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

मुरली मोहोळ, धीरज घाटे, हेमंत रासने यांना महापालिकेतील महत्त्वाची पदे दिली आणि पाठोपाठ शहर अध्यक्षपदी मुळीक या तरुण नेत्याला संधी दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like