झोपण्यापूर्वी आवश्य खावा ‘गूळ’ आणि प्यावं गरम ‘पाणी’, होतील ‘हे’ 4 फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – झोपण्यापूर्वी हळद टाकून गरम दूध अनेकजण पितात. परंतु, त्याऐवजी गूळ आणि गरम पाणी प्यायल्यास आणखी लाभदायक ठरते. यामुळे अनेक आजार दूर होतात. शिवाय हे पाणी पिण्यास चवीला गोड असल्याने कोणतीही अडचण येत नाही. नियमित हे पाणी झोपण्यापूर्वी प्यायल्यास कोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

1 पचनक्रिया
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी आणि गूळाच सेवन केल्यास पोटात थंडावा वाटतो. गॅसचा त्रास दूर होतो. गॅसचा त्रास असणारांनी हा उपाय आवश्य करावा.

2 थकवा
सतत थकवा जाणवत असल्यास सकाळी उपाशीपोटी गूळ खावा. शिवाय रात्री झोपताना गूळाचा एक खडा खाऊन त्यावर गरम प्यायल्यास थकवा दूर होतो.

3 अपचन
अन्नपचन नीट होत नसल्यास गूळ आणि गरम पाणी हो रामबाण उपाय आहे.

4 आम्लपित्त
खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे रक्त अशुद्ध होते. तसे बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्ताची समस्या होते. यावर दररोज गुळाचा एक खडा खाऊन त्यावर गरम पाणी प्यायल्यास रक्त शुद्ध होते.