Jaggery During Pregnancy | प्रेग्नंसी दरम्यान केले गुळाचे सेवन तर होतील ‘हे’ 5 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गर्भधारणा (Pregnancy) ही अशी वेळ असते जेव्हा काही महिलांना गोड तर काहींना मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते. जर तुम्हालाही सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल आणि काहीतरी आरोग्यदायी खाण्याची इच्छा (Jaggery During Pregnancy) असेल, तर तुमच्यासाठी गूळ (Jaggery) उत्तम आहे. गूळ हा प्रत्येकासाठी आरोग्यदायी पर्याय मानला जातो. गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास गरोदर महिलांना (Jaggery During Pregnancy) फायदा होतो.

 

तज्ञांच्या मते, हार्मोनल असंतुलन मॅनेज करण्याबरोबरच, गूळ इम्युनिटी बूस्ट (Immunity Boost) करतो. सूज आणि वेदना यासारख्या समस्या कमी करतो. गरोदर महिलांना गुळाचा कसा फायदा होतो (How Jaggery Benefits Pregnant Women) ते जाणून घेवूयात.

 

1. गुळात असते भरपूर आयर्न (Jaggery Contains A Lot Of Iron)
निरोगी रक्त पेशींच्या विकासात आयर्नची महत्वाची भूमिका असते, जे गर्भधारणेदरम्यान (Jaggery During Pregnancy) महत्वाचे असते. गुळामध्ये कमी प्रमाणात आयर्न (Iron) असते, ज्यामुळे ते रोजच्या वापरासाठी आरोग्यदायी आणि साखरेला चांगला पर्याय ठरते.

 

2. संसर्ग रोखण्याचे काम करतो गूळ (Jaggery Prevent Infection)
गरोदरपणात गूळ खाल्ल्याने रक्त शुद्ध (Blood Pure) होते तसेच रक्त अशुद्ध करणारा कचरा आणि विषारी पदार्थ (Toxic Substances) शरीरातून बाहेर टाकले जातात. यात अनेक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म (Anti-bacterial Properties) आहेत जे संसर्ग रोखण्यास मदत करतात. कमजोर इम्युनिटी असलेल्या लोकांसाठी देखील गुळ फायदेशीर ठरू शकते.

3. शरीरात पाणी थांबण्याचे कमी करतो गूळ (Jaggery Reduces Water Retention In The Body)
गरोदरपणात शरीरात पाणी साचून राहणे ही एक सामान्य समस्या आहे, ती बरी करण्यासाठी गूळ उपयुक्त ठरू शकतो.
गुळात मध्यम प्रमाणात पोटॅशियम (Potassium) आणि सोडियम (Sodium) असल्याने इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत होते.

 

4. पचनाला चालना देतो गूळ (Jaggery Stimulates Digestion)
जर तुम्हाला गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता (Constipation) आणि अपचन (Indigestion) यांसारख्या पचनाच्या समस्यांचा (Digestive Problems)
सामना करावा लागत असेल तर गूळ उपयुक्त ठरू शकतो.
गूळ हा साखरेचा नैसर्गिक प्रकार आहे ज्यामुळे पाचक एन्झाईम्सचा स्राव होतो आणि योग्य पचनास प्रोत्साहन मिळते.
तसेच बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

 

5. हाडे निरोगी ठेवतो गूळ (Jaggery Keeps Bones Healthy)
गुळात मॅग्नेशियम (Magnesium) असल्यामुळे तो खाल्ल्याने हाडे आणि सांधे (Joints) मजबूत होतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Jaggery During Pregnancy | know about 5 benefits of eating jaggery during pregnancy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Heat Wave Illnesses | उन्हाळ्याच्या हंगामात खुप सामान्य आहेत आरोग्याशी संबंधीत ‘या’ 5 समस्या, जाणून घ्या याची लक्षणे

To Remove Bad Smell | शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या