Winter Diet and Jaggery : रक्त वाढवण्यापासून ते इन्यूनिटी मजबूत करण्यापर्यंत, जाणून घ्या थंडीच्या दिवसातील गुळाचं सेवन करण्याचे 8 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आरोग्यासाठी गूळ हा साखरेला सर्वात चांगला पर्याय मानला जातो. गूळ हा एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे जो चवदार असून शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात गुळाचा वापर खूप केला जातो. त्यामध्ये प्रथिने, कोलीन, बीटीन, जीवनसत्त्वे बी १२, बी ६, फोलेट, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सेलेनियम, मॅंगनीज आणि कार्बोहायड्रेट असतात. या गुणधर्मांमुळे त्याला सुपर स्वीटनर म्हटले जाते. त्याच्या ८ फायद्यांविषयी जाणून घेऊया.

दम्यात उपयुक्त
दमा आणि खोकल्यापासून बचाव करण्यासाठी गूळ उत्तम कार्य करतो. ज्या लोकांना श्वसन संक्रमण किंवा श्वसनविषयक समस्या आहेत त्यांनी तो खावा. तिळाबरोबर गूळ सेवन करणे अधिक फायदेशीर आहे. तीळ आणि गूळ खाल्ल्याने श्वासोच्छवासाच्या समस्येपासून मुक्तता मिळते.

वजन कमी होण्यास प्रभावी
वजन कमी करण्यात गूळ उपयुक्त आहे. पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. जो इलेक्ट्रोलाइटस संतुलित करतो, चयापचय वाढवितो. स्नायूंना मजबूत बनवतो. वजन कमी करण्यात पोटॅशियमची प्रमुख भूमिका आहे.

रक्तदाब नियंत्रण
गुळामध्ये पोटॅशियम आणि सोडियम आढळत जे शरीरात अ‍ॅसिडची पातळी राखण्यास मदत करतात. यामुळे, रक्तदाब पातळी सामान्य राहते. रक्तदाब कमी आहे त्यांनी गूळ खाल्ल्यास खूप फायदा होतो.

सर्दी आणि खोकल्यामध्ये फायदेशीर
सर्दी, खोकला आणि तापामध्येही गूळ खूप फायदेशीर आहे. तो शरीरात उष्णता निर्माण करून तापाशी लढायला मदत करतो. अधिक फायद्यासाठी गूळ गरम दुधात मिसळा. तुम्ही चहा बनवूनही पिऊ शकता.

सांधेदुखी कमी करतो
गुळामुळे संधिवात किंवा सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. ज्यांना अशी समस्या आहे त्यांनी दररोज गूळ खावा. आल्याबरोबर गूळ घेतल्याने त्याचा परिणाम लवकर दिसून येतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवतो
सेलेनियम आणि झिंक सारख्या अँटीऑक्सिडंट्स गुळामध्ये भरपूर आढळतात. ते शरीरावर फ्रि रॅडिकल्स आणि इन्फेक्शनपासून बचाव करण्याचे कार्य करतात. हेच कारण आहे की हिवाळ्यात गूळ जास्त प्रमाणात खाला जातो.

अशक्तपणावर रामबाण
अशक्तपणा रोखण्यासाठी शरीरात आरबीसी, लोह आणि फोलेटची पातळी आवश्यक आहे. गुळामध्ये भरपूर लोह आणि फोलेट असते. जे अशक्तपणापासून बचाव करते. अशक्तपणा असलेल्या रुग्णांनाही गूळ खाण्याची शिफारसही डॉक्टर करतात. याशिवाय गूळ रक्त स्वच्छ करते.

पाळीच्या वेदना कमी करते
पाळीच्या वेदनांचा त्रास कमी करण्यासाठी गूळ हा एक नैसर्गिक उपाय आहे. पाळीत मनःस्थिती बदलते त्यांनी गुळही खावे. यामुळे मूड चांगला राहतो आणि शरीराला आराम मिळतो.