Video : लढाऊ विमानाच्या वैमानिकाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंबला हवाई तळावर पक्षाने टक्कर दिल्याने जग्वार या लढाऊ विमानाला इमरजन्सी लँडिंग करावे लागले होते. या लढाऊ विमानाचा व्हिडिओ समोर आला असून वैमानिकाने प्रसंगावधान दाखवून पक्ष्याने धडक दिल्यानंतर ऑईल टँक आणि प्रॅक्टिस बॉम्ब खाली टाकल्याने विमान हलके झाले व ते सुरक्षित उतरु शकले. त्यामुळे एका मोठा अपघात टाळला. हवाई दलाने वैमानिकाचे या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे.

जग्वार लढाऊ विमानाचा हा ४८ सेकंदाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात अंबाला हवाई तळावरुन जग्वार उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच विमानाला पक्षाची धडक बसते. त्यामुळे विमानाचे एक इंजिन बिघडते. त्यामुळे विमानाचे संतुलत बिघडून त्याचा अपघात होऊ शकत होता. व्हिडिओत पक्षीही दिसून येतो.

त्यानंतर काही सेकंदातच विमानाचे ऑईल टँक आणि प्रॅक्टिस बॉम्ब खाली पडतात. त्यामुळे जमिनीवर आग लागते. आगीचा रोळ आकाशात दिसून येतो. वैमानिकाने प्रसंगावधान दाखविल्याने विमान सुरक्षितपणे उतरु शकले. तसेच तो स्वत: वाचू शकला आणि महागडे लढाऊ विमानही वाचविले.

हवाई तळाच्या जवळपास नागरी वस्ती असू नये व त्यांनी कचरा टाकू नये, असे आवाहन हवाई दलामार्फत सातत्याने केले जाते. कचऱ्याच्या ढीगामुळे पक्षी त्या भोवती फिरत राहतात आणि त्यामुळे विमान अपघात होण्याची शक्यता वाढते. विमान उड्डाण करत असताना समोरील हवा विमान ओढून घेत असते.

त्याच्यासमोर पक्षी आला तर हवेबरोबरच तोही ओढला जाऊन इंजिनाला धडकतो व त्यात जळून जातो. मात्र, त्यामुळे विमानाला आग लागण्याची तसेच इंजिन बंद पडून मोठा अपघात होण्याची शक्यता असते. अशा अपघातात आपण वैमानिक आणि लढाऊ विमान गमावून बसतो.

जेथे ही दुर्घटना घडली त्या अंबाला हवाई दलाच्या तळाच्या अगदी जवळ नागरी वस्ती वाढली आहे.

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार

केसांना ‘डाय’ करताय ? मग आधी हे वाचा, आणि लक्षात ठेवा

‘अ‍ॅसिडिटीचा’ त्रास टाळण्यासाठी हे उपाय करा, होईल फायदा

घरातल्या या मसाल्याने रात्रीतून पिंपल्स होईल गायब …

You might also like