थायलंडमध्येही आता ‘यळकोट यळकोट जय मल्हार’

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन 
खंडेराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत. आपल्या अचाट पराक्रमांनी आणि कर्तृत्वाने रयतेचं रक्षण करणारा राजा अशी या खंडोबाची ओळख. खंडेरायांच्या चरित्रामधून आणि विविध आख्यायिकांमधून त्याच्या या पराक्रमांची माहिती वाचायला आणि ऐकायला मिळते.हीच माहिती जय मल्हार या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली होती. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या खंडेरायावर आधारित ‘जय मल्हार’ या मालिकेनं मराठीत लोकप्रियतेचं शिखर गाठल्यानंतर हिंदी भाषेतही या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.आता थेट भारताबाहेर ‘सदानंदाचा यळकोट… यळकोट, यळकोट जयमल्हार’ असा आवाज दुमदुमणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’23a07ed6-caf1-11e8-afdc-8361dd0bcc9a’]

झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणा-या या मालिकेने इतिहास रचला. केवळ महाराष्ट्राच नाही तर देशभरात आणि जगातही जिथे जिथे मराठी प्रेक्षकवर्ग आणि खंडोबांचा भक्तगण आहे तिथे तिथे ही मालिका पोहोचली. खंडेराया आणि त्याच्या दोन राण्या यांची कथा रंगल्यामुळं या मालिकेची लोकप्रियता वाढत गेली आणि अनपेक्षितरित्या ही मालिका तीन वर्षे रंगली. देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि इशा केसकर या तीनही कलाकारांना या मालिकेनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून उदंड प्रेम मिळवून दिलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्हीएफएक्स पद्धतीनं या कथानकाला अधिक भव्यता मिळवून देणारी ही मराठीतील पहिली मालिका ठरली होती.

कोकीनची तस्करी करणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

आता ही मालिका थायलंडमध्येही प्रसारित होणार त्याचा प्रोमोसुद्धा प्रदर्शित झाला आहे.मल्हार देवाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता देवदत्त नागेनं सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर केला आहे. थायलंडमधील ‘Zee Nung’ या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. ‘हे अत्यंत अभिमानाचे क्षण आहेत,’ असं देवदत्तनं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं.

जे दहा वर्षांपूर्वी बोललो तेच खरे आहे : नाना पाटेकर