‘त्यानं’ आधारकार्डवर नोंदवला जेलचा ‘पत्ता’, ‘मर्डर’ केसमध्ये कारागृहातच पोहचला

लखनऊ : वृत्तसंस्था – एका व्यक्तीने त्याच्या आधार कार्डवर लखनऊ जेलचा रहिवासी पत्ता लिहिला होता. नंतर या माणसावर खुनाचा आरोप करण्यात आला. त्याच तुरुंगात त्याला पाठविण्यात आले होते, जिथला रहिवासी पत्ता त्याच्याकडून सांगितला गेला होता. सनी चौहान नावाच्या व्यक्तीने त्याच्या आधार कार्डवर लखनऊ कारागृहातील रहिवासी पत्ता लिहिला होता. एका व्यक्तीच्या मृत्यूचा तपास पोलिस करत असताना हे प्रकरण उघडकीस आले आणि पुराव्यांचा शोधात असताना पोलिस त्याच्याकडे पोहोचले.

संतोष तिवारी (४०) नावाचा चालक गेल्या महिन्यात लखनऊच्या हद्दीत गोसाईगंजमधील शेखनापूर भागात रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळला. त्यांच्या पोस्टमार्टम अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे पुरावे सापडले. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासात उघडकीस आले खून प्रकरण

या प्रकरणाचा तपास करणारे गोसाईगंजचे एसएचओ डीपी कुशवाह म्हणाले की, आम्ही अनेकांना चौकशीसाठी बोलावले असता आम्हाला आढळले की सनीच्या आधार कार्डावर त्याचा रहिवासी पत्ता लखनऊ कारागृह म्हणून दर्शविला गेला आहे. एसएचओ कुशवाह यांच्यानुसार सनी चौहानने दावा केला आहे की त्याचे वडील लखनऊ तुरूंगात काम करतात, पण जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा जेल अधिकारी म्हणाले की तो गँगस्टर ऍक्ट अंतर्गत तुरूंगात आहे.

दारू काढून घेतल्याच्या कारणावरून खून

संतोष तिवारी मृतावस्थेत सापडल्यानंतर सनी चौहान यांनी 24 फेब्रुवारी रोजी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ट्रक नेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान सनी चौहान ने कबूल केले की त्याने दारूच्या नशेत संतोष तिवारीची 4 जणांसह हत्या केली होती. संतोष तिवारीने आपल्या मित्रांकडून दारू काढून घेतल्याने त्याला ठार मारले अशी कबुली सनीने दिली .त्याला बुधवारी अटक करण्यात आली असून हत्येत सहभागी असलेल्या इतर मित्रांचा शोध सुरू आहे.