‘सम्मेद शिखरजीचे पावित्र्य नष्ट करू नये’ : जैन समाजाचे मोदींना आवाहन

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन –  झारखंडमधील सम्मेद शिखरजी येथे बनवण्यात येणाऱ्या पर्यटन स्थळाला विरोध दर्शवण्यासाठी आज पुण्यातील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. जैन समाजाकडून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील सेवन लवज चाैकात असलेल्या आेसवाल बंधू समाज हाॅल पासून या मोर्चाची सुरुवात झाली. सदर मोर्चामध्ये जैन समाजातील व्यापारी वर्ग तर सहभागी झाला होताच परंतु विशेष म्हणजे तरुण वर्ग या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. महिलांनीही यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवत झारखंडमधील सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्री बनवण्यात येणार असलेल्या पर्यटन स्थळाला विरोध केला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6619368f-d066-11e8-b074-09764e56edd9′]

जैन धर्मातील 20 तीर्थकारांची निर्वाणभूमी असलेल्या सम्मेद शिखरजी येथे झारखंडमधील सरकार पर्यटन क्षेत्र बनवणार आहे. यासाठी जैन समाजातील साधू, साध्वींनी झारखंड सरकारला, शिखरजी येथील पावित्र्य नष्ट होऊ नये यासाठी तेथे पर्यटन क्षेत्र बनवू नये असे आवाहन केले. त्यांचं म्हणणं आहे की, जैन समाजाने नेहमीच अहिंसेला प्रोत्साहन दिले आहे. पर्यटन क्षेत्रामुळे तेथील पावित्र्य नष्ट होईल, तेथे हिंसेक वातावरण निर्माण होईल. मूक मोर्चामध्ये 5000 पेक्षा जास्त जैन समाजातील लोकांनी आपला सहभाग नोंदवला.

सदर मोर्चामध्ये जैन समाजातील श्वेतांबर, स्थानकवासी, दिगंबर आणि तेरापंथी या चारही संप्रदायातील सर्व परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान परम पूज्य आचार्य श्रीमद् विजय युगभूषणसूरीश्वर यांनी सम्मेद शिखरजीला ‘होल वर्शिप’चा दर्जा देण्यासाठी सरकारला आवाहनही केले. पुढे ते असेही म्हणाले की, शिखरजी पर्वताला पूजा आणि उपासनेचं स्थळ म्हणून मान्यता द्यावी. सदर क्षेत्राला पर्यटन स्थळाच्या रुपात विकसित करू नये.

[amazon_link asins=’B07HGBFSC7,B01D2IBM5S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’773fc73a-d066-11e8-a49f-c1feccae3c60′]

सदर मोर्चा ओसवाल बंधु समाज हॉल ते कलेक्टर ऑफिस असा काढण्यात आला होता. तेथे जैन समाजातील परम पूज्य आचार्य श्रीमद् विजय युगभूषणसूरीश्वर यांच्याकडून कलेक्टर आॅफिसला निवेदन देण्यात आले.

[amazon_link asins=’B06Y5HD2T7,B019XSHB7O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5088041a-d067-11e8-9141-6fbf62262e20′]